सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
आज कधी नव्हे तेवढ्या प्रकर्षाने सर्वांत प्रथम तुझी आठवण झाली. तस तर तुझ्यासाठी अन माझ्यासाठी दिल्ली नविन.अपरिचित. कोणी ओळखीचं नव्हतच जिथे उजाडेल तेथे उजाडेल या निर्धाराने आपण दिल्ली कुच केलेलं पहिला दिवस स्टडी सेंटरवर परिचयाच्या सोपस्कारा नंतर कळलं की तुझी ‘माझी मदरटंग कन्नड आहे मग काय आग्रा,मथुरा,वृंदावण,ऋषीकेश, हरिव्दार,वाघाबार्डर फिरताना तु कन्नड भाषेमुळे मला अधिक जवळचा आपला वाटलास. तु मुळांत लाजरा बुजरा हां हुं च्या पुढे तुझी गाडी पुढे कांही सरकेच ना मग मीच पुढाकार घेतला व सरळच विचारलं माझ्याशी मैत्री करशील ? माझं मित्रत्व स्विकरशील ? तु थोडा कावरा बावरा झालास गालावर लाली वगैरे काय म्हणतात ते ही झालं. पण शेवटी हो म्हणालास. तुझा त्यावेळेसचा आनंद आजही मी अनुभवते आहे. किती मस्त असते ना ती फिलींग तुला कोणी तरी मुलगी मित्र म्हणून साद घालत होती. मित्र म्हणून तु खुप चांगला वागलास माझी काळजी घेतलीस पहिल्यांदा मी ही कुण्या परक्या पुरुषा बरोबर वावरताना.तनावमुक्त भार रहित होत होते. केवळ तुझ्या संगतीत मी माझे स्त्रित्व ‘स्त्री असणेच भान विसरून निव्वळ मैत्रीच्या रंगात रंगले कुठलेही रंग नसताना रंगानं नखशिखांत न्हाले मी. ही सारी किमया तुझ्या भाषणाची ज्यात तु म्हणाला होतास कुठलाही बाईचा पदर हा आईचाच ममतेचाच असतो.मी निर्धास्त होते बिनधास्त होते. तुझ्या सोबत वावरताना संकोच रहित भयरहित स्त्रीपुरुषाच्या आभासा पासून त्या जाणिवेपासून मैलों दुर निर्मळ, नितळ, पारदर्शी तरी प्रेमळ लाघवी अहसास अहसास त्या नाव नसलेल्या नात्याचा विश्वासाचा भरोश्याचा आपुलकीचा स्निग्धतेचा तरलतेचा जाणीवांच्या जाणीवांचा मनाला उन्नत प्रवाही जीवनाचं सोनं करणारं तो परिस स्पर्श कुठल्याही स्पर्शा शिवायचा खरं सांगू ? तुझ्या मैत्रीनं मला स्वातंत्र्य शिकवलं स्वतंत्र व्यक्तित्व दिलयं अंडरस्टॅडिंग शिकवलसं आपल्या मैत्रीवर मकरंद व सुब्बी थोडं जळायची. पण तुला कांही जाणवलं नाही ते मकरंद माझ्या गावाकडचा म्हणून माझी सलगी त्याच्याशी अधिक त्याचही तुला कांही नाही वाटलं मीच तसे विचारलं तर तु अमृता प्रितम व इमरोजचं उदाहरण कथन केलतस एकदा अमृता इमरोजच्या स्कुटरवर पाठीमाग्रे बसून जाताना त्याच्या पाठिवर कांही तरी चाळा म्हणून म्हणून बोटाने तीचा प्रियकरचं नाव साहिर-साहिर गिरवत राहते अन् इमरोजला विचारते तुला कांही कसं वाटतं नाही ? त्यावर इमरोज म्हणतो पाठ ही तुझीच आहे आणि साहिरही तुझाच आहे मला त्यात काय वाटायचय ? हा असतो विश्वास साथीदारावर विश्वास असला की पजेसिव पणा कमी होतो. हे सगळं अद्भुतरम्य होतं ते तु मला निर्मोही अलिप्त कसं राहायचं ते शिकवलंस अशरीरी प्रेम स्पर्शी आभासा पलीकडे पाहण्याचं बळ दिलसं तु त्या अर्थाने मुक्ती दाता आहेस. तुला आपली पहिली भेट आठवते का रे ? मला आठवतेच तुझी ती पहिली भेट आजही जशीच्या तशी तसं तर तुझं मोटीवेट करणारं इन्स्पाईरिंग करणारं प्रत्येक व्हॉटस् अप मेसेज तुझा आवाज ऐकता यावा म्हणून घंटोंशी तुला ऐकता यावा म्हणून संभाषणांत गुंतवून ठेवण्याचा माझा प्रयास तुझा आवाजचं तसा सुदिंग मनाला उभारी देणारा आश्वासक पाठीवर थाप देणारा मी आहे नको काळजी करू म्हणणारा समजुन घेणारा समजावून सांगणारा तु माझा गाईड मेन्थोर काऊन्सलर होतास. माझे सगळे निकनेम तुला पाठ होते तरी ही त्या नावांनी तु कधी मला हाक नाही मारलीस लाडात आलास तर पिल्लू तेवढ म्हणायचास कारण माझं मुळ नावाचं तुला खुप आवडायचं मनापासून भावायचं मला तुझं माझ्या साठी कासावीस होणं,बेचैन होणं काळजी करणं माहितय माझ्यासाठी तुझं टेन्शन घेणं ही जागणं ही माहितीय नको एवढं काळजी करूस म्हटलं तरी तुझं केअर करणं थांबणार नाही हे ही जाणून होते मी. तुला भेटण्यासाठी रडणारी यक्साईट होणारी अन् भेटल्यावर आनंदाने उडया मारणारी स्वर्गीय आनंदात नाहणारी गप्पाचं गुन्हाळ पेटवणारी,रुसणारी,फुगणारी भांडणारी अगावू पणा करणारी अन् तु सगळं निट निस्तारणार तसं गोड स्वभाव तुझा एक वक्ता चांगला श्रोता दोन्ही तुला छान जमायचं – तुझं खळाळून हसणं साऱ्या समस्यांवरचं समाधान होतं चिल कसं व्हावं ते तु मला शिकवलंसं तुझी प्रत्येक सवय तुला रुसल्यावर कसं मनवायाचं हेही मी शिकले अन् आता तर माझी खात्रीचं आहे तु दिर्घकाळ माझ्यावर राग धरून नाही राहू शकत.मी आज ही जशी होते. तशीच आहे. तु मात्र बदलू नको तु काय बदलतोस मीच तुला नाही बदलू देणार तेवढं कौशल्य प्राप्त केलेय मी आता मला काय पाहिजे होते रे फक्त तुझ्या हृदयातील गाभऱ्या पर्यंत पोहचायचं होत आत्म्याच्या संपर्कात यायचं होतं त्याच्याशी तादात्म पावावयाचं होतं रे ! हे तुला सांगायच तर सोड जाणवू पण द्यायचं नव्हतं.अन तीथचं गल्लत झाली एका अबोल नात्यांची निशब्द भावनाची अव्यक्त संवेदनांची सांगता झाली रुजण्या आधी अंकुरण्या आधी मला आश्चर्य वाटतं.तुला कसं कळलं नाही माझं मन कि उगाच गुंता वाढवू नये म्हणून इग्नोर करत होतास ? मी भरकटेन असं तर तुला नाही ना वाटलं होतं ? अशी कशी मी भरकटेन ? तुला माझ्यावर विश्वास नव्हता का रे ? आय स्वेअर मला काहीचं नको होत.तु मला योग्य ट्रॅकवर आणलसं मोटीवेट केलतसं अन् आता काय सांगतोस प्रवाहान किणाऱ्याच्या मोहात पडू नये . त्याचा फोकस फक्त सागर हवा – तीथचं समर्पण तिथच विलीन व्हाव होय रे कळतेय मला पण ज्या किणाऱ्यांनी प्रवाहाला सांभाळलय सावरलंय मर्यादा आखुन दिलय त्याबद्दल मी अशी कशी रुक्ष राहू शकते थोडा तरी स्नेहाचा ओलावा असेलच ना? मला असं तुझं वागण कळतचं नाही. मध्येच बोलणं थांबवतोस कॉन्टॅक्ट ब्लॉक करतोस. अशाने मला किती त्रास होतो कळतेय तुला? तु का पुन्हा मला ऑबनार्मल करणारं आहेस ? तु जेंव्हा जेव्हा तोडलेस ‘ तेंव्हा तेव्हा मी आतुन उद्वस्थ झालेय आश्रुंनी उशी भिजुन जायची बरं झालं अश्रुंचा कोणता रंग नव्हता.नसता उश्यानी सगळी कहाणी सकाळी व्हायरल केली असती . मी स्वतःला जेवढी आवडते तेवढी किंबहुना त्यापेक्षा अधिक तु मला आवडतोस हे मी तुला कसं सांगू ? आवडण्या बद्दल नको गल्लत करून घेवूस .हे बघ आपणाला चंद्र तारे आकाश हिमालय रंगांची उधळण करणारा रवी शितलं स्पर्श करणारा वायू जे-जे उदात्त आहे मंगल आहे पवित्र आहे ते-ते आपणाला आवडते.तसाच तु ही तु माझं पॅशन होतास आहेस नातं ट्रॉन्सप्रंट पवित्र निर्मळ राहु शकत नाही का रे आपल्या बददल कोणी काळजी करत असेल ममत्व दाखवत असेल तर आपण सुखावून जातो. कोणीतरी आपल्या आनंदासाठी धडपडतो विचारपूस करतोय जेवलसं का ? गोळ्या घेतलेस का टेक केअर म्हणतोय ही निरपेक्ष भावना किती विलक्षण असते नाही ? आपलं स्विंग होणारं मुड सांभाळणारा हा खरा मित्रच तर असतो कोणी माझं कांहीचं ऐकुन घेत नव्हतं तेंव्हा तु माझं सगळं ऐकत राहिलास . माझं एकटेपण वाटून घेतलस . माझे अश्रू माझ्या वेदना शोषून घेतल्यास तु – तु शब्द दिला होतास दररोज रात्री माझी विचारपुस करशील म्हणून पण आताशा तुझ्याकडे रात्रचं होत नाही वाटते आता तु मला कितीही नाकारलसं तरी मला कांही फरक पडणार नाही. मी राहणार आहे — तुझ्या स्मरणात तुझ्या आठवणीत तुझ्या स्वप्नात तुझ्या लिखाणात तुझ्या कवितेत तु जेव्हा जेव्हा आरश्यात पाहशील तेव्हा तेंव्हा तुझ्या डोळ्यांत दिसेन मी लहान लेकरांच्या हास्यांच्या खळखळाटात कोवळ्या उन्हाच्या कवडश्यात पावसाच्या थेंबात दवात मी प्रकाशाने परावृत्त होवून तुझ्या डोळ्यांत समावेन बघ. अशीच भेटायला येत जाईन बघ. तु बघच ..!

