नरेन्द्र राऊत ग्रामीण प्रतिनिधि आर्णी
“जगाला युद्ध. नव्हे तर बुध्द हवे”या संकल्पनेतून भिमायान बुध्द विहार समिती व विश्र्वशांती बुध्द विहार समिती इचोरा यांनी तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा व विचाराचा व्हावा यदृष्टीने गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मूर्ती प्रतिष्ठापनेचा विधि पूज्य भंते तिरिमतो यांनी संपन्न केला. तर पूज्य भंते सरिपुत सेनापती नांदेड व भंते मेंधकर नेर यांनी उपस्थतांना धम्मदेसणा दिली. कार्यक्रमाला परिसरातील अनेक बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व समुदायास भोजन दान देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील संघदीप देवतळे, अविनाश भगत, बाबाराव मुनेश्र्वर, वैशाली विनोद स्थूल, प्रशिक मूनेश्वर, हिरा गायकवाड, संकेत पाटील, यांनी प्रयत्न केले.

