रविंद्र पवार तालुका प्रतिनिधी शिरूर
शिरूर .श्री संत जगद्गुरु क्रांतीकारी सेवालाल महाराज मित्र मंडळ कारेगाव व गोर सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने कारेगाव मध्ये क्रांतिकारी सद्गुरु सेवालाल महाराज यांची जयंती 15 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत हरी भक्त पारायण मंगल महाराज यांचा गोर बंजारा बोली भाषेत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच 15 फेब्रुवारी सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत सेवा लीलामृत ग्रंथ पारायण होणार आहे आठ ते दहा वाजता क्रांतिकारी श्री संत जगद्गुरु सेवालाल महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे , पुन्हा दहा ते बारा गोर बंजारा बोलीभाषेतील भजन व येणाऱ्या पाहुणे मंडळी यांचे स्वागत सत्कार कार्यक्रम होणार आहे व ठीक बारा वाजता श्री संत सेवालाल महाराज यांच्या भोग लावण्याचा कार्यक्रम होणार व त्यानंतर संध्याकाळी चार ते नऊ डीजे मिरवणूक राहील असे आयोजक टीम क्रांतिकारी सेवालाल महाराज मित्र मंडळ कारेगाव . नगरीचे नायक व जयंती अध्यक्ष देविदास भाऊ पवार, उपाध्यक्ष अनिल भाऊ जाधव, सचिव कारेगाव नगरीचे कारभारी निलेश भाऊ जाधव , शहसचिव जगदीश चव्हाण सदस्य विठ्ठल साहेब पवार ,शरद भाऊ जाधव ,कुणाल जाधव, अभिषेक जाधव ,धीरज राठोड, निशांत जाधव, विष्णू राठोड,रामेश्वर पवार ,गोकुळ राठोड ,गोपाळराव पवार, विकास राठोड ,वीरेंद्र राठोड ,गजानन आडे, सुमित जाधव, अमोल जाधव, अरविंद जाधव, व समस्त सर्व कारेगाव येथील गोरबंजारा बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक टीम क्रांतिकारी सद्गुरु सेवालाल महाराज मित्र मंडळ .कारेगाव, व गोरसेना पुणे नगर हायवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

