मनोज बिरादार ग्रामीण प्रतिनिधी नांदेड देगलूर
शहरातील पवित्र दत्त मंदिरात पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या हस्ते आरती व प्रसाद वाटपाने देगलूर टाइम्स लाईव्ह या डिजिटल माध्यमाच्या शुभारंभाचा सोहळा संपन्न झाला. या वेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. साप्ताहिक देगलूर टाइम्स चे मुख्य संपादक गजानन शेषेराव टेकाळे यांनी मागील दोन वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून गोरगरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. हे कार्य अधिक प्रभावी आणि जलद गतीने होण्यासाठी देगलूर टाइम्स लाईव्ह या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरूवात करण्यात आली आहे.या प्रसंगी पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी देगलूर टाइम्स च्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करून नवीन डिजिटल माध्यमासाठी शुभेच्छा दिल्या. समाजातील वंचित घटकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या या माध्यमाची वाटचाल अधिक यशस्वी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. संपादक गजानन टेकाळे यांनीही गोरगरीब आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली दोन वर्षे आम्ही कार्यरत आहोत. आता हेच कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी डिजिटल माध्यमातून देगलूर टाइम्स लाईव्ह सुरू केले आहे, असे सांगत समाजहितासाठी सतत कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे, दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश रनवीरकर, राष्ट्रवादीचे युवा जिल्हा कार्याध्यक्ष विक्रम नागशेटिवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील आणि देगलूर टाइम्स चे कार्यकारी संपादक शेख असलम, संतोष मनधरणे, अनिल पवार, मनोज बिरादार धनाजी जोशी, अमोलकुमार शिंदे, रियाज अत्तार, नागेश पलपवार, गजानन शिंदे आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक गजानन टेकाळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद वाघमारे यांनी केले व देगलूर टाइम्स लाईव्ह चे तालुका प्रतिनिधी धनाजी देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

