संजय डोंगरे ग्रामीण प्रतिनिधी माना
माना : विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापुर मतदार संघाचे माजी आमदार तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक तुकाराम बिडकर यांचा अकोला शिवनी विमानतळाजवळ पेट्रोल पंपा समोर पिकप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अकोला विमानतळावर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून घरी परत येत असताना त्यांचा अपघात झाला. तुकाराम बिरकड ये 2004 ते 2009 या काळात मुर्तीजापुर मतदार संघाचे आमदार होते. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे ते अध्यक्ष होते. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माळी समाजातील ते मोठा चेहरा होते. आमदार होण्याआधी तुकाराम बिडकर अकोला जिल्हा परिषदेत सभापती होते. तसेच मराठी टीव्ही मालिका सर्जा राजा टीव्ही मालिकेत त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती तसेच त्यांनी मराठी चित्रपटात सुद्धा काम केले होते. मागील दोन महिने अगोदर सुद्धा तुकाराम बिडकर यांच्या गाडीला धक्का लागल्याने ते रस्त्यावर कोसळले होते. त्यावेळी त्यांना उपचारासाठी मुंबई जावे लागले होते. उपचाराहून परतल्यानंतर एक महिना होत नाही तोच ही दुसरी घटना घडली. या घटनेत ते मृत्युमुखी पडले आहे. त्यांच्या ह्या बातमीने संपूर्ण विदर्भात शोक काळा पसरली आहे. त्यांच्या कारकिर्दीत मूर्तिजापूर येथे उच्च तंत्रज्ञान शिक्षण महाविद्यालय आले होते. मुर्तीजापुर तालुक्यात त्यांनी बरेचसे भरीव कार्य केलेले होते. म्हणूनच त्यांची खास ओळख निर्माण झाली होती. तुकाराम बिडकर यांच्या जाण्याने पश्चिम विदर्भातला सर्वात मोठा नेता गमावल्याचा अनेकांना दुःख आहे.

