मनीष ढाले ग्रामिण प्रतिनिधी, फुलसावंगी
बंदी भागात रेतीचा बेसुमार उपसा होत असल्याचे वृत्त प्रकाशित होताच महसूल विभागाचे पथक तैनात उमरखेड तालुक्यातील बंदी भागात बेसुमार रेती उपसा सुरू असल्याचे वृत्त प्रकाशित होताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन धाडी टाकून टॅक्टर महसूल विभागाच्या ताब्यात घेऊन कार्यवाही केल्याचे चित्र आहे आज सोमवारला दराटी मंडळाचे पातुरकर मंडळ अधिकारी कनकापुरे तलाटी यांनी बोरगाव गावातील नप्ते नामक मालकांची चोरटी वाहतूक अमडापूर परिसरात पकडून दराटी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.बंदी भागात अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्याला सळो की पळो करून सोडणारे अधिकारी कुंभकर्णी झोपेत होते परंतु सुरोशे मंडळ अधिकारी यांनी बेधडक कार्यवाहीसाठी जणू पुढाकार घेतला असून रेती माफियांचे धाबे दणाणले आहे बंदी भागातील दराटी पोलिसांच्या हद्दीत चालणारे अवैध धंदे बिटजमादाराच्या आशिर्वादाने फोफावत असल्याचीही चर्चा जोरदार आहे.अवैधरीत्या चालणाऱ्या धंद्याचा बीमोड करण्यासाठी एकही वरिष्ठ अधिकारी धजावत नसुन दिवसेंदिवस वाढत चाललेली रेती व अवैध अवैध धंदे फोफावत आहे संबंधित ठाण्याच्या हद्दीतील अनधिकृत व्यवसाय मोठ्या झपाट्याने वाढत आहे खाकी वर्दी मधील कर्मचारी रेती माफिया कडून मालामाल होत असल्याची ओरड होत आहे.

