सुरक्षा साधनांचा अभाव, व्यवस्थापनाची बळजबरी
नागेंद्र चटपल्लीवार
शहर प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथुन जवळच असलेल्या ताडाळी एम आय डी सी परीसरात धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड विज केंद्रात करण अशोक शेळके(वय ३७) चंद्रपुर बाबुपेठ येथिल कामगार काम करीत असतांना मृत्यु पावला.धारीवाल कंपनीत कामगार सुरक्षा कायदे पायदळी तुडवून सुरक्षा साधने पुरवठा न करताच कामे करन्यास भाग पाडुन कंपनी कामगारांच्या जीवाशी रोज खेळत असते.घटनेच्या दिवशी बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी ला करण अर्धा तास कामावर उशीरा पोहोचला होता त्याचे कामाचे आठ तास दुपारी २ वाजता पुर्ण झाले होते.आठ तासाचा कालावधी पुर्ण करन्यासाठी व्यवस्थापनने बळजबरी करुन अर्धा तासासाठी थांबन्यास करण ला अडवून ठेवले होते. कामाचे तास संपल्यानंतर करणचा कंपनीतच अपघाती मृत्यु झाला हे विशेष.विज केंद्र परीसरात करणच्या गळ्यातील दुपट्टा कन्वेयर बेल्ट मधे अडकल्यामळे तो बेल्ट सोबत ओढल्या गेला.यातच त्याचे मुंडके सोडुन संपूर्ण शरीराचा चेंदामेंदा झाल्याचे कामगार वर्गात चर्चा आहे. घटनेनंतर कामगार युनियन चे नेते, नातेवाईक यांनी कंपनी च्या गेटवर कंपनी व्यवस्थापन विरुद्ध आक्रोश केला.कामगार नेत्यांनी मृत कामगाराच्या परीवाराला नुकसान भरपाई देन्याची मागणी केली.कंपनी परीसरात तनावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे पडोली पोलीस व चंद्रपुर दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सद्या परीस्थिती नियंत्रणात असुन परीसरात तनावपूर्ण शांतता आहे.

