राहुल जैन ग्रामीण प्रतिनिधी रावेर
धामोडी येथील जिजाऊ माता नगरातील कांतीलाल मुरलीधर पाटील यांच्या घरासोमोरील गटार नळांना पाणी आल्यानंतर प्रचंड तुंबलेली असते व पाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत आहे यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून गारिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे गटार तुंबल्याने बऱ्याच दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावरून वाहत येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. रोज सकाळी रस्त्यावर पाणी पसरून रस्त्याला तळ्याचे स्वरूप येत आहे. ऐन मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना परिसराला वळसा घालून जावे लागत आहे. मोठ्या गटारीचे पाणी लहान गटारात येते व त्यामुळे सदरील गटार ओव्हर फ्लो होऊन सदरील पाणी हे रस्त्यावर साचत असून त्यामुळे येथे असलेल्या खड्डेमय रस्त्यावर हे दुर्गंधीयुक्त पाणी साठून राहत आहे. यामुळे हे गटार त्वरित दुरुस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


