मारोती बारसागडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली :-विश्वब्राम्हण पांचाळ समाज तालुका चामोर्शी यांच्या वतीने नागमंदिर चामोर्शी येथे प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव निमित्त पांचाळ समाज मेळावा साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक गोविंदवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शामराव श्रीकोंडावार, महेश तुम्पल्लीवार, विनोद चिटलोजवार, वसंत कागदेलवार, उमेश किरमिरवार, सुधाकर कत्रोजवार, यशवंत मुम्मडवार, गंगाधर गटकोजवार, प्रवीण कामदार आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रभू विश्वकर्माच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी भजन,उखाणे स्पर्धा, गीतगायन स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, एकल व सामूहिक नृत्य सादर करण्यात आले. सर्व विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच वैभव रवींद्र श्रीकोंडावार यांची कृषी सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पत्रकार उमेश गझलपेल्लीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शैलेश कागदेलवार,प्रकाश चिटलोजवार,सुधीर कंदिकुरवार,सागर देवोजवार, विजय कागदेलवार, प्रवीण अडपल्लीवार यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला पांचाळ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


