तारा पाटील जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : बोईसर परिवहन आगारातील बसगाडय़ा भंगार सदृश असून दिवसेंदिवस प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष असल्याचे सांगितले जाते. दि. ७/१ /२०२५ रोजी सौ. सुचिता सुधीर नाईक , अजय चिंचकर उबाठा चे सदस्य निवेदन सादर करण्यासाठी बोईसर आगारात आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मा .श्री. एजाज ई. शेख आगार व्यवस्थापक बोईसर यांना देण्यात आले. तसेच बोईसर बस परिवहन आगारातील बसगाडय़ा भंगार सदृश असल्याचे सांगून या निवेदनाद्वारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष वेधून घेत बोईसर मधिल राज्य परिवहन महामंडळाचा बस – थांबा आणि आगारातील अवस्था आमुलाग्र सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. तसेच बस आगारातील बसगाडय़ा अनेक वर्षे वापरात असल्यामुळे त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. आतील आसने भक्कम नाहीत. खिडक्या उघडत नाहीत. पावसाळ्यात टपावरून पाण्याची गळती होते. नाहक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.बस चालकांना डावीकडे असलेला बहिर्गोल आरसा सतत हालत असतो. म्हणून त्यांच्या दांडीला दोरी बांधून किंवा प्लास्टिक ची बाटली कोंबुन ठेवली जाते. रिमोल्डिंग केलेला टायर राखीव व ( स्टेपनी ) म्हणून ठेवले जातात. पण ते काही वेळाने थोड्याच अंतरावर प्रवास केला असता पुन्हा पंचर होतात. बस अडकून पडते आणि प्रवाशांचा खोळंबा होऊन नाहक त्रास सहन करावा लागतो. बसगाडय़ा खिळ खिळ्या झालेल्या असल्याने त्याचा आवाज बस चालकांना सहन करावा लागतो . मानसिक थकवा येऊ शकतो. बोईसर बस स्थानकावर उतारूंना बसण्यासाठी अवघा एकच बाकडा आहे. बसगाडय़ा कोणत्या शहराकडे वा गावाकडे जाणार आहेत हे दर्शविणाऱ्या पाट्या दर्शनी भागावर लावलेल्या नसतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या बस थांब्यांचे जलद गतीने नूतनीकरण होणार का ? असा संतप्त सवाल सौ. सुचिता सुधीर नाईक, अजय चिंचकर उबाठा चे सदस्य यांनी केला आहे. यावेळी निवेदन सादर करताना सौ. मंजुळा गोवारी, माजी सरपंच पास्थळ , सौ. सुधा खुटे, पंचायत समितीच्या माजी सदस्या पासथळ, आदी उपस्थित होते.

