रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला
महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे,शासनाच्या या मोहिमेला सहकार्य म्हणून सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड चे अध्यक्ष नवनीत लखोटिया सचिव प्रमोदजी चांडक, उपाध्यक्ष लूनणकरंजी डागा यांनी आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना हेल्मेट वाटप करण्याचा निर्णय घेतला व तात्काळ त्याचे नियोजन करून हेल्मेट वितरणाचा कार्यक्रम आयोजित करून हिवरखेड पोलीस स्टेशनचे ए .पी.आय. गजाननजी राठोड,प्रफुल्ल पवार व हिवरखेड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी, उपमुख्याध्यापिका निमिता गांधी यांच्या हस्ते सर्व शिक्षकांना हेल्मेट वाटप करण्यात आले. त्या अगोदर हिवरखेड पोलीस स्टेशनचे ए पी आय गजानन राठोड सर यांनी सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना हेल्मेट सक्ती का करण्यात आली, हेल्मेट नसल्यामुळे किती लोकांचे प्राण गेले त्याचबरोबर हेल्मेट वापरामुळे आपण आपले जीवन सुरक्षित बनवू शकतो यासंबंधीचे मार्गदर्शन केलं. सर्व शिक्षकांनी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांचे विषयी आभार व्यक्त केले या कार्यक्रमाचे यशस्वी ते करता शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

