सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
बिलोली तालुक्यात महसुल विभागाच्या आशिर्वादाने गंजगाव येथे रात्रंदिवस अवैधरित्या विना पावत्याच्या चालत असलेल्या येथील वाळु घाटावर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूरचे पोलिस उपविभागीय अधिकारी संकेत गोसावी यांनी मंगळवारी दि.११ फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घाड टाकली आहे. यावेळी वाळुचे अनेक वाहन व दोन पोकलेनसह ३ कोटी १५ लाख १४ हजार रूपयांची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे. त्या वाहनावर बुधवारी दि.१२ फेब्रुवारी रोजी पोलिस उपनिरिक्षक दिलीप मुंडे यांच्या फिर्यादीवरून सदर वाहन चालक मालक व ठेकेदावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंजगाव वाळु घाटावर महसुल विभागातील अधिकारी, कर्मचारी व वाळु ठेकेदाराच्या संगणमताने गेल्या काही दिवसांपासून शासनाला बेबनाव करून रात्रंदिवस बिना पात्याची अवैध वाहतूक व उत्खननासाठी दिलेली हद सोडून शासकीय घाटातून वाळु उत्खनन केले जात होते. याकारवाईमुळे महसूल विभागाची बनावटगिरी उघड पडली आहे. पोलिस प्रशासच्या या कारवाईमुळे मात्र अवैद्य वाळु तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गंजगाव येथील खाजगी वाळु घाटातून मागील काही दिवसांपासून नियमबाह्य वाळु तस्करी सुरू असल्याच्या तक्रारी होत्या.वाळु ठेकेदारांना दोन हजार तीनशे ब्रास वाळु उपशाची परवानगी दिली होती. त्यासाठी १६ फेब्रुवारीपर्यंतची परवानगी देण्यात आली होती. वाळु उत्खननाची कालावधी संपुष्टात येत असल्यामुळे ठेकेदाराने पावत्या न घेताच अवैध पद्धतीने वाळु वाहतूक जोमाने सुरू केली असल्याची माहिती पोलिसांना मिळताच मंगळवारी दि.११ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी हे वाळु घाटावर येवून २३ वाहने व २ पोकलेन मशीन ताब्यात घेतली. यात काही वाहनातील वाळु रिकामी करण्यात आली तर काही वाहन चालक आपली वाहने सोडून पसार झाले आहेत. यात बिना पावत्याची पाच वाहने सापडली असून या वाहनासह दोन जेसीबी पोकलेन मशीन व काही चालकासह जवळपास ३ कोटी १५ लाख १४ हजार रूपयांची मालमत्ता ताब्यात घेऊन चालक मालक व संबंधित ठेकेदारावर पोलिस उपनिरिक्षक दिलीप मुंडे यांच्या फिर्यादीवरून गौणखनिज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत बिलोलीचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, कुंडलवाडी पोलीस उपनिरीक्षक दिलीप मुंडे,पोहेकाॅ मारोती मुद्देमवार,आनंदा शिंदे,चालक पेडेकर,पोकाॅ माधव जळकोटे,गजानन अनमुलवार,व्यंकट घोंगडे, होमगार्ड,फारुख,आदमनवार,रत्नागीरे,येपुरवार, इरफान बेग यांच्यासह पोलिसांचे पथक होते.खाजगी वाळु ठेकेदारांना नियमबाह्य वाळु तस्करीसाठी स्थानिक महसूल प्रशासनाचे पूर्णपणे सहकार्य असल्याने हा प्रकार चालू असल्याची चर्चा आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय शिंदे हे करीत आहेत.


