रवि राठोड.ग्रामीण प्रतिनिधी, वाकान
महागांव : तहसील कार्यालय, अंतर्गत येत असलेल्या विशेष सहाय्य, योजनेच्या सर्व पात्र असलेल्या लाभार्थ्यांना तहसीलदार साहेब.महागांव यांचे मार्फत जाहिर आव्हान करन्यात आले आहे.जो लाभार्थी संजय गांधी, निराधार,व श्रावणबाळ योजनेस पात्र आहेत.त्यांना सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान.(डी.बी.टि.) व्दारे वितरीत करणे सुरू झाले आहे.करीता महागांव तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड. अपडेट करून संबंधित बॅकेतुन केवायसी पुर्ण करणे बंधनकारक आहे ज्या लाभार्थ्यांचे केवायसी व आधार अपडेट.(डी.बी. टी.) मुदतीत पूर्ण होणार नाही.त्याना सदर योजनेचे लाभ मिळणे बंद होणार आहे.करीता संबंधित पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय महागांव येथे आधार अपडेट करून घ्यावेत.असे आव्हान तहसीलदार साहेब श्री अभय मस्के, यांनी केले आहे संजय गांधी योजनेचा व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या साजातील कोतवाल.(महसूल सेवक) यांच्याकडे कागदपत्रे सादर केले नसल्यास त्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड.आधार कार्ड सोबत लींक असलेला मोबाईल नंबर व बॅक खाते पुस्तकाची छायांकीत प्रत.कोतवाल (महसूल सेवक) यांचेकडे देण्यात यावे.कींवा तहसील कार्यालय महागांव येथील संजय गांधी योजना विभाग, येथे तात्काळ सादर करावे कदाचित दिलेल्या मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास तसेच आधार कार्ड, अपडेट व केवायसी न झाल्यास.(डी.बी.टी.) प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे सदर अनुदानाचा लाभ.बंद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची असणार आहे असे जाहीर आव्हान, तहसीलदार साहेब मार्फत करण्यात आले आहे

