वैभव निंबाळकर ग्रामीण प्रतिनिधि भद्रावती
सद्यस्थितीत इयत्ता 12 वी ची केंद्र परीक्षा सुरू झाली असून अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी कमालीची कसरत सुरू असल्याचे निदर्शनास येते आहे, त्यामधे विशेष करून माजरी भटाळी येथील विद्यार्थी कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांना जवळपास 30 किलोमिटर चा प्रवास हा दुचाकीने करावा लागत आहे तर कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय चे केंद्र हे टेमुर्डा दिले गेले आहे,याचे कारण टेमुर्डा येथील कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याकारणाने परीक्षा केंद्र देण्यात येणार नव्हते मात्र कोणत्याही परीक्षा केंद्र घेण्यासाठी जवळपास 200 विद्यार्थ्यांची पटसंख्या लागते या कारणाने माजरी – भटाळी येथील कर्मवीर विद्यालयाची पटसंख्या मिळवून टेमुर्डा येथील केंद्र प्रस्थापित केले,परंतु माजरी ते टेमुर्डा हे अंतर जवळपास 30 किलोमिटर अंतरावर आहे, आणि परीक्षेचा पेपर कालावधी हा 11 वाजताचा असल्याकारणाने भटाळी – माजरी येथील विद्यार्थी सकाळी लगबग तयारी करवून दुचाकीने प्रवास करून टेमुर्डा येथे पोहचत आहेत, परंतु प्रवासादरम्यान दुचाकी पंचर झाली किंवा दुर्दैवाने अपघात झाल्यास परीक्षार्थी केंद्रावर पोहाचायला विलंब, किंवा पोहचलेच नाही तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ शकते व याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच जे पालक मोलमजुरी करवून आपल्या पाल्याना शिक्षण देत आहेत त्यांच्या खिशावर कात्री लागून आर्थिक भुर्दंड सहन करत आहे.यामधे मात्र प्रवासकरताना विद्यार्थी परीक्षाकाळात चांगलेच भरडले जात आहेत.वर्जन:- मुख्याध्यापक कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालय माजरी,संतोष चौखे :-मी नुकताच चार महिन्यांपासून कार्यभार सांभाळला आहे. माझ्या अगोदरचे मुख्याध्यापकांनी सन 2025 च्या होणाऱ्या इयत्ता 12 वी होणाऱ्या परीक्षेची पूर्व कल्पना होती, विद्यार्थ्यांचे परीक्षापत्र आल्यावरच मला माहिती मिळाली, विद्यार्थ्यांना माजरी ते टेमुर्डा अंतर गाठणे खूप कठीण प्रवास झाला आहे.विद्यार्थी :- सुजाता गौरकर, सानिया इंगोले :- माजरी ते टेमुर्डा हे अंतर खूप दूर आहे, ज्यामधे आमचा वेळ आणि आमच्या पाल्यांचे दिवसभराचे काम व पैशाचा अतिरिक्त बोजा बसत आहे.

