मधुकर बर्फे तालुका प्रतिनिधी पैठण
चितेगाव रमानगर येथील एका व्यक्तीने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना. ११, फेब्रुवारी मंगळवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली. बाबूराव वसंतराव गायकवाड वय २५, रा. बीड, ह.मु. रमानगर, चितेगाव ता पैठण अशी मृताची ओळख पटली असून.या घटनेची माहिती मिळताच बिडकीनचे पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे, सहायक फौजदार अशोक सोकटकर, आप्पासाहेब माळी, दिलीप साळवे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहखाली उतरून बिडकीन ग्रामीण रुग्णाल येथे दाखल केला या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असुन अधिक तपास बिडकीन पोलीस हे करत आहे.

