भारत बुरशे ग्रामीण प्रतिनिधी पुसद
पुसद: मागील वर्षी अतिवृष्टी होऊन नदी नाले एक झाले होते. त्यामुळे पूर जन्य ग्रामीण भागातील तसेच शेती शिवारात पाणी घुसल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. तोंडाशी आलेला घास आसमानी संकटांनी व त्याचे नाहीसा केले होतं. त्यामुळे वर्षात वडसद, धनसळ, कारला, मांडवा, बोरी, बोरगडी, बोरी मच्छिद्र ,बोर नगर, राजन नगर ,कोपरा ,शेलु, वसंतपूर ,पोखरी, येहळा, हुडी, येथील शेतीच्या जमिनीशी उलथा पालथा होऊन चांगल्या जमिनीचे नाले व खडकाळ जमीन झाली आहे या गावातील बळराजा मोठ्या आर्थिक संकटात आला आहे शेतीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ह्या गावातील गरीब पूरग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर यांनी विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी सर यांना देऊन शासन दरबारी मदतीची अपेक्षा करत आहे या अगोदर विविध संस्था लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नेत्याच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीची निवेदन मार्फत शासनास सविस्तर माहिती कळविलेली आहे. पण शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे ह्या निवेदनावर सही करणारे सर्व शेतकरी दिनांक १५ फेब्रुवारी पासून उपविभागीय पुसद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा या निवेदना मार्फत दिला आहे. निवेदनावर वरील गावातील पुरामुळे नुकसान झालेला शेतकरी शेतमजूर रहिवाशांच्या सह्या आहेत. अनिल साखरे ,ओम प्रकाश शिंदे ,संतोष भालेराव, ओम साखरे, पांडुरंग करण विजय ढगे ,गजानन साखरे, विष्णू इखार , खोब्राजी कांबळे ,राजेश अंभोरे ,विनोद गावंडे ,गोदावरी गावंडे ,साहेबराव ढगे, त्यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना निवेदनावर सह्या आहेत.


