शेख शेमशुध्दीन तालुका प्रतिनिधी मुदखेड
मुदखेड शहरातील सुभाष गंज मोंढा भागात असलेल्या श्री गणेश मंदिर कलशारोहण सोहळा व श्री गणेश महापुराण कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमाचे भव्य आयोजन दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आयोजित केलं आहे.ह भ प सुनिल महाजन आष्टीकर यांच्या अमृतवाणीतून श्री गणेश महापुराण कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रम आरंभ मिती माघ कृ.०२ शके १९४६ दि.१४ फेब्रुवारी रोज शुक्रवार पासून दुपारी वेळ १ ते ४ ला सुरूवात करण्यात येणार असुन कथेची सांगता दि. २० फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.दि.२१ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० ते ११:००ह भ प सुनिल महाजन आष्टीकर यांचे काल्याचे कीर्तन सुभाष गंज मोंढा मैदानावर होणार आहे.श्री गणेश महापुराण कथा ज्ञान यज्ञ व कलशारोहण कार्यक्रमास संपन्न होताच महाप्रसादाचा लाभ शहरातील बायलेकी तसेच भक्तगण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान श्री गणपती मंदिर संस्थान व समस्त गावकरी मंडळी मुदखेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

