मनीष ढाले ग्रामीण प्रतिनिधी फुलसावंगी
येथे शेतकरी बैलगाडा संघटना यांच्या वतीने ( क गट) १३ फेबुवारीला शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. आशीर्वाद डेव्हलपमेंट सिटीच्या समोर फुलसावंगी ते ठाणकी रोडवर हा जंगी शंकरपट होणार आहे . या करिता प्रथम बक्षीस २१ हजार रुपये स्व. सुभाषराव नाईक यांच्या स्मृतिप्रत्यार्थ कुणाल सुभाषराव नाईक ग्रामपंचायत सदस्य व बाळू भाऊ हाके शिपीनाथ देवस्थान टाकळी यांच्यातर्फे तर व्दितीय बक्षिस स्व. रामकिशन पांडे माजी सैनिक यांच्या स्मृति-पित्यार्थ डॉक्टर चंदन भैय्या पांडे व योगेश बाजपेयी तंटामुक्ती अध्यक्ष फुलसावंगी यांच्या वतीने १५ हजार. डॉक्टर पुंडलिक आमले यांच्यातर्फे तृतीय बक्षीस १० हजार तर स्व. विजयराव उदावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ गायत्री ज्वेलर्स यांच्यातर्फे ८ हजार रुपये, स्वप्निल नाईक यांच्या तर्फे चतुर्थ बक्षीस ६ हजार रुपये,दिनेश त्रिंबकराव नाईक यांच्यातर्फे ४ हजार, समशेर लाला व आरिफ खान यांच्या वतीने ५ हजार , निलेश जयप्रकाश जैस्वाल यांच्यातर्फे ३ हजार ,निजाम सरकार यांच्यातर्फे २ हजार ५००, गजानन थाडवेकर यांच्यातर्फे ३ हजार ५००, चिंतामण मस्के यांच्यातर्फे २ हजार, बाबू खान पठाण व मुक्तार पठाण यांच्यातर्फे २ हजार ५०० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जुम्मा खान लाला, विठ्ठलराव नाईक ,राजेश्वर महाजन ,डॉक्टर चंदन पांडे ,योगेश वाजपेई, गणेश भाऊ उदावंत दिनेश नाईक, कुणाल नाईक शमशेरलाला ,निलेश जयस्वाल, श्री कायदे, बाबुराव व्हडगिरे, कादर लाला, इरफान कुंदन, भगवान शेळके ,रघुनाथ बाबळे ,मुन्ना नाईक ,मदन भैया पांडे, मुस्ताक शेठ, बळवंत दळवे, आजमलाला ,शंकर वैद्य , राजे गणेश मंडळ, साई राजे गणेश मंडळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,कृषी संघटना व्यापारी संघटना, पत्रकार संघटना,यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

