देवलाल आकोदे सर्कल प्रतिनिधी हसनाबाद
भोकरदन तालुक्यातील हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात इन्चार्ज मेडिकल ऑफिसर म्हणून डॉ हर्षदा रमेश पांडे यांची आरोग्य विभागाने नियुक्ती केली असून त्यांच्या या निवडीबद्दल हसनाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात माजी जि प सदस्य तथा रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष गणेश बापू फुके,सावखेडचे सरपंच सुभाष पाटील जाधव,वजीरखेड्याचे सरपंच महेंद्र पगारे,अनिकेत फुके,हसनाबाद येथील सहाणे हॉस्पिटलचे डॉ.सहाणे,भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघ ग्रामीणचे उपाध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य देवलाल आकोदे,चेअरमन अंकुश वाडेकर,गणेश पवार,पत्रकार राधेश्याम वैष्णव,लॅब टेक्निशियन श्री मिरकर यांनी त्यांचा अभिनंदन व सत्कार करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.त्या मा जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे यांची पुतणी आहे.जवळपास दोन ते तीन वर्षापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रास इन्चार्ज मेडिकल ऑफिसर नसल्याने प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी रुग्णांना सेवा देण्यात येत होती.त्यांच्या या निवडीबद्दल माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे,भोकरदन-जाफराबाद चे आमदार संतोष पाटील दानवे,कन्नड-सोयगाव च्या आमदार संजना ताई जाधव,बदनापूर-अंबड चे आमदार नारायण भाऊ कुचे,माझी जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम शेठ जाधव,हसनाबाद चे सरपंच सुरेश काकाजी यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ मंडळी यांच्याकडून शुभेच्छा देत अभिनंदनचा वर्षाव होत आहे.या कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल कुंडकर सर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी औषध निर्माण अधिकारी मिरज जाधव,आरोग्य सेवक शिवराज वैष्णव,श्री बावणे,आरोग्य सेविका,सुनिता मडकर,शेख सिस्टर,सीता ऊके,श्रीमती प्रिया ढिलपे,शंकर सोनवणे,शेख गणी अकबर यांची उपस्थिती होती.

