त्रिफुल ढेवले ग्रामीण प्रतिनिधि मोर्शी
मोर्शी : लग्नाचे आमिष दाखवून एका 25 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीवर सतत 6 महिने अत्याचार केला. या अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील एका शेतात मध्यप्रदेश येथील परिवार रखवालदारीचे काम करतो. त्या शेताच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या शेतात त्यांच्या गावालगत असलेल्या गावातील कुटुंब राहते. या कुटुंबातील सुदर्शन उईके वय 25 रा. मध्यप्रदेश हा तरुण अल्पवयीन मुलीच्या झोपडीत येत होता. गावालगतचा असल्याने ती अल्पवयीन सुद्धा त्याच्यासोबत बोलत होती. मागील वर्षी आरोपी उईके ऑगस्टमध्ये तिच्या घरी आला, घरी कुणी नसताना ‘तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करतो’, असे म्हणून त्याने त्या मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तो वारंवार तिच्या घरी येत होता. त्यामुळे ती तरुणी गर्भवती राहिली. याबाबतची माहिती तिने आईवडिलांना दिली. त्यानंतर याप्रकरणी मोर्शी पोलिस स्टेशनमध्ये अल्पवयीन फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सुदर्शन उईके याचे विरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील एका कॉलेजच्या प्राचार्याने शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. शाळेतील अल्पवयीन मुलीला घरकामाच्या नावाखाली स्वतःच्या घरी बोलावून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या शाळेच्या मुख्याध्यापकानेच इतर शिक्षकाच्या मदतीने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे शुक्रवार दि. ७ रोजी उघडकीस आले आहे. विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार आणि नंतर तिचा खून करावा, यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ही सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उघडकीस आला होता. त्यानंतर आता मोर्शी येथे अत्याचार प्रकरण समोर आले आहे.

