प्रशांत मुनेश्वर शहर प्रतिनिधी नांदेड
मानवतेचे प्रचारक महान योगी संत रविदास महाराज यांची ६४८ वी जयंती नांदेड शहर परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने जयंती आयोजन करण्यात आलं होतं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून ते शक्ती नगर नांदेड येथील संत रविदास महाराज यांच्या मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. शहरात ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी केल्याचं दिसून आलं, काही ठिकाणी अन्नदानाच्या माध्यमातून महाराजांची जयंती साजरी करण्यात आले. या शोभायात्रेत सहभागी व्हावे, अस आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघ नांदेडच्या. वतीने प्रवेशाध्यक्ष माधव गायकवाड, जयंती मंडळ अध्यक्ष माधव निंबाळकर, शहराध्यक्ष सदीप गोरे, संजय सोनटक्के, के. के. गंगासागर, गजानन जोगदंड, रवी गंगासागरे, शंकर थडके, सुरेश शेळके, सुनिल माहुरे, केरबा कसारे, गोविंद माऊली पार्टीकर, विशाल बनसोडे, सरोजताई सोनटक्के, ज्योती सोनटक्के आदींनी केले आहे.

