संजय शिंदे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
दत्तकला शिक्षण संस्थेच्या, इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च फॉर गर्ल्स, भिगवण, पुणे, महाराष्ट्र, ही फार्मसी क्षेत्रातील एक अग्रगण्य व नामांकित संस्था असून, दिनांक 20 आणि 21 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित ‘आंतरराष्ट्रीय परिषदेच्या’ माहितीपत्रकाचे प्रकाशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, मा. उपाध्यक्ष राणा सूर्यवंशी, मा. सचिव माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, यांच्या हस्ते झाले यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ज्योती जावळे, विभागप्रमुख डॉ. के. श्रीकांतकुमार, डॉ. हरीबा जेडगे, डॉ. डी. चीनाबाबू, डॉ. गायत्री ढोबळे, प्रा. अमित पोंदकुले, प्रा. दिक्षा शिंदे, प्रा. योगेश सातपुते इ. उपस्थितीत होते. फार्मसी क्षेत्रातील अंतर्दृष्टी, नवकल्पना, उदयोन्मुख ट्रेंड, प्रगती, सर्वोत्तम पद्धती आणि आव्हाने सामायिक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नामांकित संस्थांमधून संसाधन व्यक्ती म्हणून प्रमुख तज्ञांद्वारे मार्गाद्दर्शन करण्यात येईल. हे जगभरातील विद्यार्थी, संशोधक, विद्वान, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग व्यावसायिकांना खूप उपयुक्त ठरणार आहे. परिषदेमध्ये सहभागी विद्यार्थी, संशोधक, विद्वान, शिक्षणतज्ज्ञ याच्यासाठी मौखिक आणि पोस्टर सादरीकरणासाठी विशेष सत्राचे आयोजन करणायत आले आहे. परिषदेची ठळक विशिष्टे म्हणजे प्रख्यात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील वक्ते, तांत्रिक प्रदर्शन सत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रम. इच्छुक सहभागी https://forms.gle/gGVVdZkyS9yvLYRb9 या लिंक चा वापर करून नोंदणी करू शकतात तसेच ईमेलद्वारे dattakalaconference2025@gmail.com व ९४९४६८२७३२, ९८९०१५१५०९, ७७७६००२९२९ या मोबाईल नंबर वरती संपर्क साधू शकता. तरी आपले ज्ञान वृद्धिंगत करण्यासठी या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा प्राचार्य डॉ. विशाल बाबर यांनी केले.

