सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध होण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पुस्तकांचे अवांतर वाचन करण्याची गोडी निर्माण करावी असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथील प्रा.डाॅ. बालाजी चिरडे यांनी केले. ते कुंडलवाडी येथे कै.गंगाधरराव चिनन्ना दरबस्तेवार व कै .रमाबाई गंगाधरराव दरबस्तेवार यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय आदर्श शिक्षक व आदर्श पत्रकार गंगा- रमाई स्मृती पुरस्कार २०२५ या कार्यक्रमाच्या वितरण सोहळ्याच्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पानसरे महाविद्यालयाचे उपाध्यक्ष राजेश्वर उत्तरवार, सर्वोदय छात्रालयाचे अध्यक्ष अशोक कांबळे ,सामाजिक कार्यकर्ते साईनाथ उत्तरवार ,सपोनि ज्ञानेश्वर शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी जी.बी.बिरमवार, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. बालाजी चिरडे,जेष्ठ पत्रकार भीमराव बडूरकर,आदर्श सहशिक्षक शंकर नागोराव कूरणापल्ले सह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा.चिरडे म्हणाले की, आज शैक्षणिक गुणवत्तेचा पाया ढासळण्याचे कारण पालक व विद्यार्थी आपल्या पाल्यांच्या वाचनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना प्रकट वाचन करणे जमत नाही. त्यामुळे घरी व शाळेत शिक्षक व पालकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे प्रकट वाचनाचा सराव घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढीस लागेल. केवळ आपल्या शैक्षणिक पाठ्यपुस्तकाच्या वाचनावर अवलंबून न राहता संबंध महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, लेखक यांची दर्जेदार पुस्तके वाचणे आवश्यक आहे .यातून विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, आपली भाषा,इतिहास, नामवंत व्यक्तीचे चरित्र कळते व वाचनातून स्व अनुभूती घेऊन बरेच काही गोष्टी नकळत शिकायला मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्याचा कळ तयार होतो व पालकांनी आपल्या पाल्याला असे आवडते क्षेत्र निवडून देण्याची मुभा द्यावी. असे अनेक वाटा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत ज्यामध्ये जाऊन विद्यार्थी प्रामाणिकपणे काम करू शकतील व त्यांचे जीवन आनंदी बनू शकेल म्हणून वैचारिक क्षमता वाढविण्यासाठी आज वाचन ही काळाची गरज बनली आहे असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले .यावेळी आदर्श शिक्षक म्हणून शंकर नागोराव कुरणापल्ले तर आदर्श पत्रकार म्हणून भीमराव गंगाराम बडूरकर यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह, शाल, पुष्पहार देऊन त्यांचा यतोचित गौरव करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जी.बी. बिरमवार,सपोनि ज्ञानेश्वर शिंदे, साईनाथ उत्तरवार अशोक कांबळे, राजेश्वर उत्तरवार, कुणाल लोहगावकर ,शंकर कुरणापल्ले, भीमराव बडूर कर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नीता दरबस्तेवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुभाष दरबस्तेवार यांनी मांनले .शेवटी कार्यक्रमाची सांगता सुरुची भोजनानेझाली.

