पवन ठाकरे
ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर: संग्रामपूर तालुक्यातील एका गावातील रहिवासी अल्पवयीन मुलगी वय (४) वर्ष हिला एका (21) वर्षीय भामट्या नराधामाने दुसऱ्या गावात असलेल्या संत्र्याच्या शेत शिवारात घेऊन गेला असता. तसेच त्या शेतात तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केला. अत्याचार प्रकरणी सुनील कालुसिंग निगवाले वय २१ रा.डोईफोडिया (मध्यप्रदेश) या नराधामावर सोनाळा पोलिस ठाण्यात अपराध कायमी नं३०/२०२५ कलम ६४(२) च (झ) ६५. ६५.(२) भा न्या स २०२३ सहकलम ४,५(I) (m) (N),6,8 पोक्सो २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास सोनाळा सपोनि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पो उपनिरीक्षक महादेव खोने पोकाॅ. परमेश्वर तितरे. पो काॅ. राहुल पवार करत आहेत.


