सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर निर्दयीपणे 48 जनावरे कोंबून घेऊन जाणारी दोन आयशर वाहने मेहकर शहरातील सारंगपूर बायपासवरील यशराज हॉटेलसमोर सतर्क युवकांनी पकडली आणि जनावरांची सुटका केली. दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आली असून, 1 ऑगस्टला रात्री 9.30 सुमारास ही कारवाई करण्यात आली. इस्माइल मो. कासीम (30, रा. हयात कम्पाउंड, प्लाॅट क्र.22 धारावी मुंबई), जुबेर अहमद मुहम्मद हुसेन (27, रा. रसूलपूर, ता. मिसरौलिया, संत कबीरनगर उत्तरप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.
अश्विन विजय पवार (26, रा. सराफा लाइन मेहकर) हे त्यांचे मित्र प्रल्हाद अण्णा लष्कर, रोहित सोळंके, अक्षय दीक्षित (सर्व रा. मेहकर) यांच्यासह जेवण करण्यासाठी यशराज हाॅटेलमध्ये गेले होते. जेवण करून हॉटेलसमोर ते उभे असताना तिथे दोन आयशर रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल असे उभे राहिले. त्यातून खड- खड आवाज आल्याने अश्विन आणि त्यांच्या मित्रांनी आयशरच्या चालकास वाहनात काय आहे असे विचारले. तेव्हा त्याने दोन्ही आयशरमध्ये म्हशी असल्याचे सांगितमले. त्यामुळे या सर्वांनी आयशरमध्ये पाहणी केली असता म्हशी दिसल्या. पांढऱ्या रंगाचे पहिल्या आयशरमध्ये (MH 04 HS 6435) 15 वगारी, 8 रेडकू असे एकूण 23 जनावरे होती.
दुसऱ्या लालसर आयशरमध्ये (MH04 JK 3647) 12 वगारी व 13 रेडकू अशी 25 जनावरे होते. ही जनावरे आखूड दोरीने बांधून निर्दयतेने व क्रूरतेने वाहनांत कोंबलेली होती. त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्थाही केलेली नव्हती. अश्विन आणि त्यांच्या मित्रांनी आयशरचालकांची नावे विचारली असता त्यांनी मो. इस्माइल मो. कासीम व जुबेर अहमद मुहम्मद हुसेन अशी नावे सांगितली. जनावरे कोठून आणली व कोठे नेणार असे विचारले असता त्यांनी ही जनावरे नेर (जि. यवतमाळ) येथून घेऊन औरंगाबादला जात असल्याचे सांगितले. अश्विन पवार यांनी मेहकर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी दोन्ही आयशर वाहने पोलीस ठाण्यात जमा करून जनावरांना दिलेल्या क्रूर वागणुकीबद्दल गुन्हा दाखल केला आहे. 12वगारी व 13रेडुक असे एकूण 25नग वय दोन वर्षे 50000पंन्नास हजार.15वगारी व 8रेडुक असे 23नग वय अंदाजे 3वर्ष 46000हजार रू
जनावरांसह वाहने असा 96हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतले आहे