नरेंद्र राऊत
ग्रामीण प्रतिनिधीआर्णी
मौजे उमरी (कापे) येथील उपसरपंच उत्तम कांबळे यांनी मा. जील्ह्याधिकारी यवतमाळ यांना दिनांक ६-२-२५ लां एक निवेदन देऊन विनंति केली की जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या मुळ समस्या म्हणजे गावोगावी हागणदारी मुक्त असे फलक लावले असेल तरी संपूर्ण ग्रामीण भागात त्या फलकाच्या बाजूलाच सगळी घाण असते एका ही ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक यां विषयी दखल घेत नाहीत. पण श्री उत्तम कांबळे उपसरपंच यांनी या विषयाची दखल घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या हागणदारी आणि प्रमुख वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या उकिरड्या कडे मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांना एक निवेदन सादर करून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे या साठी संपूर्ण ग्रामीण भागात चर्चा सुरू असुन सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.तेव्हा यवतमाळ जिल्हा चे जिल्हाधिकारी या निवेदनाकडे कश्या प्रकारे लक्ष देतील याकडे यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व नागरीकांचे लक्ष लागले आहे.

