महर्षि तुकबाबा यांच्या 33 व्या पुण्यतिथि निम्मीताने आयोजन
संतोष भवर
शहर प्रतींनिधी अंबड
तालुक्यातील ताडहादगाव येथील सद्गुरू रामानंद सरस्वती (तुकबाबा )यांच्या 33 व्या पुण्यतिथि निमित्ताने श्रीक्षेत्र सिद्धेश्वर पिंपळगाव तालुका घनसावंगी येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीच्या सप्ताहाची सुरुवात दिनाक ७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी होणार असून दिनाक १४ फेब्रुवारी शुक्रवार रोजी या सप्ताहाची सांगता होणार आहे तर या सप्ताहामध्ये भागवताचार्य श्री.ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या सुमधुर वाणीतून आपणास श्रीमद भागवत कथेचे श्रवण करण्यास मिळणार आहे.त्याच बरोबर यावर्षीच्या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी म्हणजे दिनाक ७ फेब्रुवारी शुक्रवार रोजी भागवताचार्य श्री.ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जोशी यांचे रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान हरिकीर्तन होणार आहे तर दुसर्या दिवशी दिनाक ८ फेब्रुवारी शनिवार रोजी आचार्य भगवंत महाराज पुरी पंचमुखेश्वर संस्थान भाटेपुरी तळा गेवराई यांचे हरिकीर्तन आहे तसेच दिनाक ९ फेब्रुवारी रविवार रोजी योगीराम महाराज वायसळ (शास्त्री) रामकृष्ण भक्तीधाम लखमापुरी,छत्रपती संभाजीनगर यांचे कीर्तन आहे. तर १० फेब्रुवारी सोमवार रोजी श्री १००८ स्वामी शिवेंद्रजी चैतन्य महाराज,यशवडी देवस्थान यांचे कीर्तन असून दिनाक ११ फेब्रुवारी वार मंगळवार रोजी विद्याविनोद वैभव पांडुरंग महाराज उगले परभणी यांचे हरी किर्तन होणार असून दिनांक १२ फेब्रुवारी बुधवार रोजी आचार्य पांडुरंग शास्त्री चितोळे आळंदी देवाची यांचे हरी किर्तन होणार आहे दिनांक 13 फेब्रुवारी वार गुरुवार रोजी १००८ महंत स्वामी अमोलांनद गिरी सच्चिदानंद आश्रम सावत्रा मेहकर यांचे हरी किर्तन होईल तर शेवटचे काल्याचे कीर्तन दिनाक १४ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी १०ते १२ यावेळेत ह.भ.प.बळीराम महाराज कुटे (बीड) यांचे होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू रामानंद सरस्वती (तुकबाबा) यांच्या पुण्यतिथि निमित्ताने गेली ३२ वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सिद्धेश्वर पिंपळगाव येथे परमपूज्य एकनाथानंद रामानंद सरस्वती उर्फ भोलेबाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. या सप्ताहाला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून हजारो भक्ताची उपस्थिती असते. अंबड तालुका व परिसरातील हा सर्वात मोठा व भव्यदिव्य सप्ताह असतो अनेक भाविक भक्त आपले दू:ख व अडचणी घेऊन भोलेबाबा कडे येतात व बाबाच्या मार्गदर्शन व आशीर्वाद घेऊन आपले दू:ख निवारन करतात
अशा या आध्यात्मिक व धार्मिक सप्ताहाचा व काल्याच्या महाप्रसादाचा आनंद घ्या व येथील विकासकामाला आपल्या इच्छा शक्तिनुसार मदत करा असे आवाहन या संस्थानचे सचिव विजयानंद महाराज व सुरेशनंद महाराज यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ह्या सप्ताह ला शुभेच्छा संदेश दिला आहे

