मनोज भगत ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील माजी ग्रामपंचायत सदस्य रवी (राणा) घुंगड मित्र परिवार यांनी आयोजित केलेल्या भव्य हळदीकुंकू कार्यक्रमात पाच हजार च्या वर महिलांची मंदियाळी होती. अशी प्रतिक्रिया अनेक उपस्थित महिलांनी दिली. हा कार्यक्रम हिवरखेड येथील केवल देशमुख यांचे शेतात पार पडला. कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध झाकी व भारुड सम्राट पवन उंबरकर यांनी आपल्या धमाल कार्यक्रमाने उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले. पवन उंबरकरांनी जवळपास पाच ते सहा तास विविध खेळ आणि मनोरंजनाची मेजवानी दिली.कार्यक्रमात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, ज्यामध्ये महिलांनी उत्साहाने भाग घेतला. बक्षिसे म्हणून प्रथम बक्षीस कानातली सोन्याची नथ रवी राणा मित्रपरिवाराकडून,दुसरे बक्षीस फ्रिज रवी राणा घुंगड मित्रपरिवाराकडून, तिसरी बक्षीस 32 इंची एलईडी टीव्ही सौ मधुबाला राजेंद्रजी चांडक यांच्याकडून, चौथे बक्षीस ड्रेसिंग टेबल सौ सुखवंती उमेश जयस्वाल यांच्याकडून, पाचवे बक्षीस सोन्याची नथ सौ सीमाताई संतोष राऊत यांच्याकडून, तर सहावे बक्षीस 11 नग पैठणी साड्या सौ कृतिका सुमित ढबाले यांच्याकडून देण्यात आले. कार्यक्रमात महिलांनी उखाणे, गीत, गायन आणि कविता सादर करून आपल्या कलांचे प्रदर्शन केले. त्यांच्या सृजनशीलतेने कार्यक्रमात एक वेगळाच रंग आणला. महिलांनी “महिलांचा एकच नारा: भावी नगराध्यक्ष रवी राणा” या घोषणांनी वातावरणात उत्साह भरला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित महिलांचे स्वागत करण्यात आले. महिलांच्या एकजुटीने आणि उत्साहाने हा कार्यक्रम आणखी खास बनला. या कार्यक्रमामुळे हिवरखेडच्या महिलांना एकत्र येण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक एकजुटीला बळ मिळाले. रवी राणा यांच्या नेतृत्वात भविष्यातील नगराध्यक्ष म्हणून त्यांचा नारा सर्वत्र गूंजत राहावा, अशी अपेक्षा सर्व महिलांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी (राणा) घुंगड मित्रपरिवार यांचे विशेष आभार मानले गेले, त्यांच्या मेहनतीमुळे हा उत्सव शक्य झाला. कार्यक्रमात सर्व उपस्थित महिलांना सौभाग्याचे वान देण्यात आले.

