कैलास श्रावणे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
सिने पार्श्वगायिका रेश्मा सोनावणे यांचे गायन तर सिध्दार्थ मोकळे यांचे व्याख्यानपुसद- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पुसद तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यागमुर्ती रमाबाई आंबेडकर जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. बाबसाहेब आंबेडकर यांच्या सामजिक राजकीय जीवनात रमाबाई यांचे अमूल्य अशे योगदान आहे. त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा व आंबेडकरी अनुयायांना प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते.वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष व मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांचे व्याख्यान या वेळी होणार आहे. तर सुप्रसिद्ध सिनेगित पार्श्व गायिका रेश्मा सोनावणे ज्यांनी वाट माझी बघतोय रिक्षावाला व ही पोरगी साजूक तुपातली अशी बहारदार गाणे गायली आहेत त्यांच्या बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ७फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन लोकांनी मोठ्या प्रमाणत सहभागी व्हावे असे आवाहन वांचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव यांनी केले आहे.या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी वर्षा माधव वैद्य असुन प्रमूख अतिथी म्हणून, माधव वैद्य, डॉ. राजेश वाढवे, ॲड. प्रियदर्शी तेलंग, मीनाक्षी मोटघरे, उज्वला जाधव, पूजा राठोड, अरोही राठोड, अश्विनी पूनवटकर, विजयमाला साखरे, संगीता कांबळे आदी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाच्या आयोजनात, समता सैनिक दल, वंदना ग्रुप, परिवर्तन बहुउद्देशीय संस्था, निळे वादळ, भीम बॉईज, विदिशा महिला मंडळ, सुजाता महीला मंडळ, यशोधरा महिला मंडळ, सांची महिला मंडळ आदी संघटना सहभागी आहेत.

