राजपाल बनसोड तालुका प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : पाणी गरम करण्याकरिता गॅस पेटविता दिग्रसहरातील देवनगर येथे 5 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात दोन घरातील साहित्य जळून खाक झाले. देवनगर येथील अशोक मंगल सडमाके यांनी सकाळी उठून पाणी गरम करण्यासाठी घरातील गॅस पेटविला. अशातच गॅस सिलिंडर ने अचानक पेट घेत पोट झाला बघता बघता अग्नी मे रौद्ररूप धारण केल्याने शेजारील लक्ष्मण सडमाके यांच्या घराला आग लागली. दरम्यान प्रसंगावधान राखत नागरिकांच्या मदतीने घरातील नागरिकांना घराबाहेर काढल्याने जीवित हानी टाळली. मात्र या आगीत अशोक सडमाके यांच्या घरातील फ्रिज, मिक्सर, टीव्ही, कपाट, अन्न धान्य, टिन पत्रे सह इतर घरगुती साहित्य तसेच लक्ष्मण सडमाके यांच्या घरातील इलेक्ट्रिक साहित्य जळून खाक झाले. परिसरातील नागरिकांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी आणि देवनगरी येथील माजी नगरसेवक केतन रत्नपारखी यांनी घटनास्थळी भेट दिली. महसूल विभागाच्या वतीने घटनेचा पंचनामा करण्यात आला. नुकसानग्रस्त कुटुंबीयांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

