मारोती बारसागडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली :- वनविभाग आलापल्ली, वनपरिक्षेत्र कार्यालय मार्कंडा (कंसोबा) अंतर्गत गुंडापल्ली उपक्षेत्रातील विजनगर गावाजवळील जंगलात विद्युत प्रवाह सोडून चितळ वन्यप्राण्याची शिकार प्रकरणी एकास १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, एक फरार आहे. रामरतन बकिम मंडल रा विजयनगर तालुका मुलचेरा असे आरोपीचे नाव असून, तन्मय बुधदेव बाडाई रा विजयनगर तालुका मुलचेरा फरार आरोपीचे नाव आहे. सदर घटना २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० ते ८ वाजताच्या दरम्यान घडली. मार्कंडा (कंसोबा) वनपरिक्षेत्राकडून प्राप्त माहितीनुसार आरोपी रामरतन मंडल व सोबती तन्मय बुधदेव हे दोघे चितळ वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या हेतूने गुंडापल्ली उपक्षेत्रातील विजयनगर जवळील जंगलात १ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास विद्युत प्रवाह सोडला होता.२फेब्रुवारी रोजी चीतळाची शिकार केल्याची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यानी आरोपी रामरतन मंडल यांचे घर गाठले असता चीतळाचे मास शिजवताना आढळून आले. रात्री ७.३० ते ८ च्या दरम्यान क्षेत्र सहाय्यक आर एल बानोत यांनी गुन्हा नोंदवून आरोपीस ताब्यात घेतले तर सोबती तन्मय बाडाई हा फरार झाला.आरोपी रामरतन मंडल यास ४ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम २ (१६) ९३९४४ (ब) ४९ ( ब ) व ५१ अन्वये ४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी पर्यंत १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी इनवते यांच्या मार्गदर्शनात गुंडापल्ली उपक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक आर. एल. बानोत करीत आहेत. मार्कंडा कंसोबा परिक्षेत्रात गस्त घालण्यासाठी वनरक्षक जी एम आखाडे, वनरक्षक एस जी राठोड.किशोर आलम,निरंजन मंडल.क्षेत्र सहाय्यक विवेकानंद चांदेकर अक्षय राऊत,धानोरकर सहकार्य करीत आहेत.

