मारोती बारसागडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली :- प्रत्येक माणसाला एकमेकांच्या सहवासाची आणि सहकार्याची गरज असते. सहकार्याशिवाय कोणतेही काम तळीस जात नसते. जो सहवास सोडून एकलकोंडी जीवन जगतो, जो कुणाचेही सहकार्य घेत नाही तो नीरस असतो. स्व प्रभाकरराव बिसन माध्यमिक आश्रम शाळा येडानुर शाळेत मुख्याध्यापक पदावर राहून मी बराच काळ काढला आहे. शाळा चालवणे हे एकट्याचे काम नाही तर संपूर्ण चमुचे काम आहे. येथील स्व प्रभाकरराव बिसन माध्यमिक व श्री अमरसिंग नाईक प्राथमिक दोन्ही शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अतिशय कर्तव्यदक्ष राहून मला मोलाचे सहकार्य केले त्यामुळेच मी आज सेवा निवृत्तीपर्यंतचा काळ बघितला आहे असे मत स्व प्रभाकरराव बिसन माध्यमिक आश्रम शाळेचे सेवा निवृत्त मुख्याध्यापक एन जी सालवटकर यांनी व्यक्त केले. स्व प्रभाकरराव बिसन माध्यमिक व श्री अमरसिंग नाईक प्राथमिक आश्रम शाळा येडानुर यांच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला त्यावेळी ते सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक एस व्हि भोयर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक जी एस गोटेफोडे, आर एल बोदनकर, एस डी बोकडे, एम जी दूधबावरे, पी पी वाळके, एन एस पिठाले, सी सी गव्हारे, पत्रकार पुंडलिक भांडेकर, व्हि एन वडनेकर, बी पी पोटावी, डी एम सूनतकर, एस बी जाधव, सुंदर जाधव, आर बी रायपूरे, साईनाथ वासेकर, गेडाम मॅडम आदी उपस्थित होते. याप्रसंगी से नि मुख्याध्यापक एस जी सालवटकर यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन एस डी बोकडे यांनी केले तर आभार आर एल बोधनकर यांनी मानले कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित होते.

