बाबाजी वाघमारे ग्रामीण प्रतिनिधी पारनेर
तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील मुंबई स्थायिक जनतेचे धार्मिक संप्रदायात मोठ्या प्रमाणात योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केले आहे. कुलाबा मुंबई येथील विठ्ठल रखुमाई हरिनाम सप्ताह मंडळाने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास आमदार दाते यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा पारनेर, जुन्नर, शिरुर, आंबेगाव तालुक्यातील मुंबई स्थायिक जनतेच्या वतीने माजी आमदार अशोकराव धात्रक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. अखंड हरिनाम सप्ताहाचे हे ९२ वे वर्षं असून दरवर्षी राज्यातील नामांकित किर्तनकार या ठिकाणी सेवा देत असतात. पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने एकत्र येऊन या सप्ताहाचे आयोजन केले असून दरवर्षी लोकसहभागातून होत असलेल्या या धार्मिक कार्यक्रमचा लाभ हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने घेत असतात. यावेळी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष वसंत चेडे, शिवाशेठ बोरकर, माजी नगरसेवक संभाजी देशमुख, माजी नगरसेवक श्रीमती सुषमा शेखर, मंडळाचे अध्यक्ष वसंतशेठ बुचुडे, सचिव पिराजी पवार, पारनेरचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय कुलट, कृष्णाशेठ पवळे, राजूशेठ वराळ, मच्छिंद्र लंके, कोंडिभाऊ वाढवणे, शिवाजी लाळगे, कोंडिबा चत्तर, ज्ञानेश्वर लाळगे, संभाजी येवले, आप्पाशेठ बोरकर, वैभव पारकर, विजय हाडोळे, मच्छिंद्र काकडे, भाऊ जगदाळे, संतोष उकीर्डे, कैलास लाळगे, गणेश पाडळकर, मुरलीधरन राजळे , भारत काकडे, दादाभाऊ चौधरी, सुभाष गुंड आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार अशोकराव धात्रक म्हणाले की जी एस महानगर बॅंकेच्या माध्यमातून पुणे व नगर जिल्ह्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळ देण्याचे काम संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके यांनी केले आहे. पारनेर तालुक्यातील या ठिकाणच्या जनतेने सातत्याने विकासाभिमुख कामांना पाठबळ देण्याचे काम केले असून आमदार काशिनाथ दाते यांना आमदार होण्याची संधी मिळाली असून ते या संधीचे सोने करतील अशी खात्री माजी आमदार धात्रक यांनी व्यक्त केली आहे. यावेळी श्रीहरी महाराज पवार यांची किर्तनसेवा झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष वसंतशेठ बुचुडे यांनी केले शेवटी सचिव पिराजी पवार यांनी आभार मानले.

