सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
कुंडलवाडी शहरातील विविध ठिकाणचे अतिक्रमण हटवावे अशी मागणीचे निवेदन श्रीनिवास नरावाड यांनी बिलोलीचे तहसील चे उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी नगर परिषद कुंडलवाडी यांच्याकडे दिले आहे.शहरातील बऱ्याच ठिकाणी अरुंद रस्ते असल्यामुळे व तसेच काही व्यापारी व शहरातील काही नागरीकांनी रस्त्याच्या बाजूला असलेली नाली ओलांडून आपआपले प्रतिष्ठाने उभारले असल्याने रहदारी करताना सामान्य नागरिकांना व वाहन चालकांना याचा मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या शहराच्या महत्वाचा समस्येकडे उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे मॅडम व मुख्याधिकारी यांनी दुर्लक्ष न करता याकडे लक्ष देऊन शहरातील जोड मारोती मंदिर ते टॉप मॅन टेलर मेन रोड दुकानापर्यंत अतिक्रमण हटवणे, डॉ. तानाजी सूर्यवंशी यांच्या दवाखाना पासून ते हेडगेवार चौक ते मुंडे चौक,हेडगेवार चौक ते इंडियन गॅस ऑफीस पर्यंत मेन मुख्य बाजार पेट वरील बरेच दुकानाच्या पाट्या व हातगाड्या नगर परिषदेच्या रोडवर बसत असून त्यांना नवीन जागा उपलब्ध करून द्यावे जेणेकरून नागरिकांना याचा त्रास होणार नाही. व तसेच त्यांचा व्यवसाय सुध्दा चालेल. आणि शहराच्या विकासासाठी नगर परिषदेला जे काही निधी येत असते ते नगर परिषद प्रशासनाने योग्य त्या ठिकाणी वापर करून शहराचा विकास करावा असे निवेदनावर श्रीनिवास नरावाड,किशनराव चिन्नना कुडमूलवार,पांडुरंग मारोती सलगीरे,सायलू गंगाराम पोतुळवार,सय्यद आरीफ मोईनोदीन,शेख बाबर अब्दुल गफार,अशोक देवराव पडकुटलावार,बालाजी पांढरे,गंगाधर रामपुरे यांच्यासह अनेकांचे स्वाक्षऱ्या आहेत.


