सिध्दार्थ कांबळे ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
आपल्याकडे खाजगी शिकवणी वर्गासाठी येणाऱ्या दहावीतील विद्यार्थिनीला वाईट हेतूने त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आरोपी शिक्षक राजेश देविदास कागळे यास बिलोली येथील मा.जिल्हा न्यायधीश १ तथा अति. सत्र न्यायधीश बिलोली श्री.दिनेश ए कोठलीकर यांनी कलम ३०५ भा. द. वि. अंतर्गत दोषी ठरवुन तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पंचवीस हजार रूपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, बिलोली शहरात राहणारे फिर्यादी यांची पिडीता मुलगी इयत्ता १० वीमध्ये शिकत होती.पीडित विद्यार्थिनी जुन २०१६ पासून आरोपी राजेश देविदास कागळे याच्याकडे खाजगी शिकवणी वर्गासाठी जात होती.आठ महिण्यापासून खाजगी शिकवणी घेणारा आरोपी शिक्षक राजेश कागळे हा वाईट उद्देशाने तिच्या पाठीवर हात फिरवत होता,गाल पकडुन चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता.तुझे गणिताचे व विज्ञानाचे प्रॅक्टीकलचे गुण माझ्या हातात आहेत म्हणून धमकावत होता.कागळेच्या नेहमीच्या घृणास्पद कृत्यांना वैतागलेल्या पीडित विद्यार्थिनीने आपल्या वडिलाकडे तक्रार केली.तंबी देऊन सुद्धा सदर शिक्षक आरोपी कागळे च्या वर्तणुकीमध्ये फरक पडत नव्हता.पिडीतेला विद्यार्थिनीला शिकवणी वर्गामध्ये नेहमी टोमणे मारून मानसिक त्रास देत होता. दि.१५/०२/२०१७ रोजी पिडीत विद्यार्थिनी चे आई व वडील बाहेरगावी गेले असता अंदाजे वेळ १०.०० ते १३.३० वाजताच्या सुमारास पिडीता शिकवणी वर्गाला गेली असता आरोपीने तिला वाईट हेतूने मनाला वेदना होतील असे शब्द बोलले.त्यामूळे पीडित विद्यार्थिनीने त्या आरोपी शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून चिट्टी लिहून स्वतःचे घरी गळफास घेउन आत्महत्या केली. पिडीतेचे वडील यांनी बिलोली पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरुन पो. स्टे. बिलोली येथे गुन्हा क्र. २५/२०१७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. व सदर गुन्हयाचा तपास पुर्ण होऊन दोषारोप पत्र मा. जिल्हा व अति. सत्र न्यायालय बिलोली येथे दाखल करण्यात आले.सरकातर्फे एकूण ०९ साक्षीदार तपासण्यात आले. व मा. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याचा विचार करुन तसेच सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मा. जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश न्या.दिनेश कोठलीकर यांनी दि. ०४/०२/२०२५ रोजी आरोपी राजेश देविदास कागळे वय ३७ वर्षे, रा.मु.पो. मंगनाळी ता. धर्माबाद ह.मु बिलोली ता. बिलोली, जि. न कलम ३०५ भा. द. वि. अंतर्गत दोषी ठरवुन तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व दंड रु २५,०००/- व दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.सरकातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री. संदिप कुंडलवाडीकर यांनी बाजू मांडली. सदर प्रकरणात त्यांना तपासिक अमलदार एस. एस. दळवे पो.नि.पो.स्टे. बिलोली व पैरवी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख महेबुब शेख अहेमद हुसेन (ब.न. ५२२१) पो. स्टे. बिलोली यांनी सहकार्य केले.

