रवि राठोड ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव ः तालुक्यातील महसूल विभागातील अधिकाऱ्यांची टीम फिरत असतांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून त्या अनुसार दिनांक ०३/०२/२०२५ रोजी सकाळी ६:३० साडे सहा वाजता दरम्यान मौजा कवठा येथील नदीपात्रातुन जानाऱ्या रस्त्यावर अवैध पध्दतीने रेती तस्करी करुन वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर आढळून आल्याने संबंधित ट्रॅक्टर चालकास विचारपुस केली असता विना परवाना (विना राॅयलटी) रेती वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने महसूल विभाग अधिकारी अॅकश्यन मोडवर येउन अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसुली कार्यवाही करण्यात आली सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी साहेब (उमरखेड) यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार साहेब अभय मस्के,नायब तहसीलदार साहेब जि.एन.राठोड,(महसूल) शंकर चव्हाण (महसूल सेवक) देवानंद फोपसे,आकाश कन्नाके,सुरज लोणकर, प्रमोद काळे, यांनी संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करण्याकरिता अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसील कार्यालय महागांव येथे लाउन ताब्यात घेतले

