कैलास श्रावणे जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
पुसद ते माहुर मार्गावरील कासोळा बस स्थानक परिसरामध्ये गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.पुसद ते माहूर मार्गावर भरधाव वेगाने होणार्या वाहतूकीला आळा घालण्याचे दृष्टीने कासोळा बस स्थानका जवळ रोडच्या दोन्ही बाजूने गतिरोधक निर्माण करण्यात यावे याकरिता शिवसेनेच्या वतीने संबंधित बांधकाम विभागाला निवेदन देत मागणी केली आहे. पुसद वरून माहूरला तसेच माहूर कडून पुसदला फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. या मार्गावर गतिरोधक नसल्यामुळे वाहनधारक सुसाट वेगाने वाहने चालवीत असल्यामुळे कित्येक वेळी अपघात होऊन नागरिकांचा बळी गेलेला आहे. या मार्गावरील कासोळा बस स्थानक परिसरामध्ये रोडच्या दोन्ही बाजूस गतिरोधक निर्माण करून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांना ब्रेक लागण्याच्या दृष्टीने गतिरोधक निर्माण होणे अत्यावश्यक आहे. अशी मागणी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.संबंधित बांधकाम विभागाने पंधरा दिवसाचे आत पुसद माहूर रोडवरील कासोळा बस स्थानक चे दोन्ही बाजूस गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी दिपक काळे उपजिल्हा प्रमुख शिवसेना, संजय सिंह बयास तालुका प्रमुख शिवसेना, अनिल चव्हाण पाटील शहर संघटक शिवसेना पुसद यांचे नेत्रृत्वात आकाश चव्हाण शाखाप्रमुख कासोळा,बलदेव जाधव युवा सेना शाखाप्रमुख,गणेश चव्हाण, उमेश चव्हाण, जगदिश जाधव,रतन पवार, कपील राठोड,ओंकार राठोड, डी.जे.जाधव तसेच इतर कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. पंधरा दिवसाचे आत गतिरोधक न झाल्यास निवेदनकर्त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संबंधित बांधकाम विभाग तत्परतेने गतिरोधक निर्माण करणार का याकडे कासोळा वासीयांचे लक्ष लागले आहे.

