स्वरूप गिरमकर
ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : जिजाऊच्या लेकी आम्ही,सावित्रीच्या लेकी आम्ही माय माऊलींचा करू सन्मान, हळदी-कुंकू घरोघरीं जाऊनी .घरोघरी हळदी कुंकू समारंभ आपल्या संपूर्ण खराडी चंदननगर वडगावशेरी भागात पहिल्यांदाच हा नवीन उपक्रम राबवला आहे.यानिमित्ताने प्रभागातील सर्व माता भगिनी ना त्यांच्या दारात जाऊन हळदी कुंकवाचा मान, सन्मान देण्यात आला.यामुळे प्रभागातील माता-भगिनी च्या अडी अडचणी समजून घेण्यासाठी खुप उपयोग झाला.सर्वांचे खुप आशिर्वाद यानिमित्ताने मिळाले संपूर्ण खराडी चंदननगर वडगावशेरी प्रभागातील महापालिकेशी अडचणी समस्या जाणून घेता आल्या सर्व स्तरातील महिला भगिनींनी या उपक्रमाचे कौतुक केले एवढ्या वर्षात आमच्या दारात कधीही कोणीही राजकीय,सामाजिक, क्षेत्रात काम करणारे फक्त निवडणूक साठी,मतदान मागण्यासाठी येतात येतात परंतु आपण या हळदी कुंकू उपक्रमासाठी आलात अशी भावना अनेक माता भगिनी यांनी बोलून दाखवली.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. तेजश्री ताई बाळा पऱ्हाड,कुं.कल्याणी बाळा पऱ्हाड, सौ.शुभांगी खताडे,सौ.प्रणिता चावांडके ताईनी सहकार्य ,परिश्रम घेतले.