भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
कोसबाड ढाकपाडा गावातील ग्रामस्थांना अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. महिलांना विशेषतः अर्धा किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत होते. डोंगराळ भूभाग आणि कोरड्या पडणाऱ्या विहिरीमुळे ही समस्या अधिकच गंभीर बनली होती.
ग्रामस्थांनी ही अडचण आमदार विनोद निकोले यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तातडीने पावले उचलत अर्धा किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकून गावात नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. परिणामी, गावातील प्रत्येक घरात पाणी उपलब्ध झाले असून ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी धावपळ संपली आहे.
या जलपुरवठा योजनेच्या उद्घाटन सोहळ्याला कृषी अधिकारी डॉ. विलास जाधव, सरपंच नूतन चिपात, ग्रामपंचायत सदस्य अमिता दळवी, तारा करबट, विजय वाघात, दीपक कोद्या यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी ही योजना मार्गी लागल्याने समाधान व्यक्त केले असून, आमदार विनोद निकोले यांनी ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास पुढेही प्रयत्नशील राहण्याचा शब्द दिला.