महेंद्र गोदाम
ग्रामीण प्रतिनिधी घाटनांदुर
घाटनांदुर (प्रतिनिधी) पृथ्वीच्या भूतलावर फक्त मानवी मेंदूचा सर्वांगीण विकास अफाट वाचनामुळे शाश्वत स्वरूपात सुधारत असतो वाचन कमी झाल्यामुळे व्यक्तीची वास्तविक प्रगती खुंटत असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने विविध वृत्तपत्रासह दर्जेदार पुस्तक वाचून मस्तक सशक्त करावे असे मत प्रा उद्धव चव्हाण यांनी व्यक्त केले.
येथील श्री शंकर उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना सुहृदयी निरोप समारंभ देण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री चव्हाण यांनी आपले अभ्यासू,वैविध्यपूर्ण अनमोल विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.एल.गित्ते उपस्थित होते तर व्यासपीठावर प्रा कांदे,प्रा.सुरेश मोदी, सहशिक्षक परसराम फड,ज्येष्ठ लिपिक डापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा दिलीप आचार्य यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कु.श्रावणी दरगड व विजय कांबळे यांनी केले तर आभार सहशिक्षक अंकुश माले यांनी मानले कार्यक्रमानंतर लगेच सर्वांना स्वादिष्ट भोजन व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते