” सतीश देवरकर यांचा कौतुकास्पद उपक्रम पंचवीस वर्षाची परंपरा “
रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान
सतीश मंगल डेकोरेटर्सचे संचालक यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींना विवाह प्रसंगी आपले काही देणे लागते, या उद्धात हेतून गेल्या 25 वर्षापासून आपल्या प्रतिष्ठान मधून मंडप डेकोरेशन मोफत देऊन समाजामध्ये एक आगळा वेगळी आदर्श घालून दिला आहे.
सतीश मंडप डेकोरेशनची वाटचाल 31 डिसेंबर 1999 रोजी ग्रामीण भागातील सुरुवात करंजखेड या गावी एक छोटासा मंडप आणि जनरेटर सिस्टीम पासून सुरुवात झाली. पुढे 2002 मध्ये त्यांनी महागाव शहरांमध्ये आपल्या कार्यास सुरुवात केली. मंडप डेकोरेशनच्या व्यवसायामध्ये त्यांनी सोज्वळ बोलीभाषा मुळे असंख्य ग्राहकाची मने जिंकली. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या सहकार्याने आणि ग्राहकाच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे डेकोरेशन मध्ये नवनवीन सुधारणा करून सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ग्राहकाच्या मागणीनुसार त्यांनी भांडी बिछायत केंद्र आणि कॉटर्सची सुविधा उपलब्ध केली. मागील कोरोना कालावधीमध्ये पोलीस बांधवांना निशुल्क मंडप सेवा दिली आहे. एक जानेवारी 2022 रोजी त्यांनी महागाव शहरातील मुडाना मार्गावर भिसे पेट्रोल पंपा लगत ‘सतीश मंगल कार्यालय’नावाचे प्रतिष्ठान निर्माण करून धंद्यामध्ये प्रोग्रेस केला. सतीश देवकर यांचे सामाजिक क्षेत्रात सदैव तत्पर कार्य कौतुकास्पद आहे, मयत व्यक्तींच्या परिवारामध्ये सहभागी होण्यासाठी नि:शुल्क तातडीने मंडप सेवा उपलब्ध करण्यासाठी त्यांचे योगदान असणे ही बाब महागाव शहरातील तरुण उद्योजकांना स्फूर्ती देणारी निश्चितच आहे.
(बॉक्स)
सतीश मंडप डेकोरेशन डेकोरेशन ला आज पंचवीस वर्षाची कारकीर्द पूर्ण झाले, त्यामुळे रोपे महोत्सव वर्ष साजरी करण्यात येत आहे.
सतीश देवरकर,
संचालक, सतीश मंडप डेकोरेशन, महागांव