पैठण तालुका प्रतिनिधी
मधुकर बर्फे
पैठण:तालुक्यातील तोंडोळी येथील ग्रामपंचायत कार्यालय समाजमंदिर या मुख्य रस्त्यातील भूमीतून गटारीचे बोगस काम झाल्याने स्थानिक नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे तोडोळी येथे ड्रेनेज लाईन कामाचा बट्ट्याबोळ झाला असून हे काम सरास निकृष्ट दर्जाचे व बोगस झाले आहे.चेंबरचे ढापे फुटून सळ्याने मुंडके वर काढले आहे.चेबर आतील विटा पुर्णपणे तुटलेल्या अवस्थेत दिसून येत असून.गेली अनेक दिवसांपासून रहदारी करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असून. चेंबर झाकणाच्या सळ्या बाहेर आल्याने लहान मुले व वयोवृद्ध नागरीक महीला ग्रामस्थ याना चालताना ठोकर लागल्याने कपड्यात सळंई गुंडाळून पडून काहींना गंभीर स्वरूपाची इजा झाली असून सदरील तोडोळी सरपंच सह ग्रामपंचायत सदस्य व शासकीय पद अधिकारी यांनी लक्ष न दिल्याने स्थानिकांनी लाकूड ठेऊन फुटक्या बकेटचे आवरण हेल्मेट प्रमाणे वापरुन नागरिकांना इजा होण्यापासून सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला आहे.सदरील गावातील चेंबर दुरुस्ती कडे कोणीही लक्ष देत नाही. गावात झालेल्या विकास कामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्यामुळे हि अवस्था निर्माण झाली आहे असे मत स्थानिक नागरीकानी व्यक्त केले आहे.