अरविंद बेंडगा
तालुका प्रतिनिधी, डहाणू
डहाणू, ता. २७ : डहाणू येथे घडलेल्या आठ वर्षीय चिमुकलीवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या नृशंस घटनेविरोधात न्यायासाठी हजारो नागरिकांनी एकत्र येत डहाणू येथे भव्य जनआक्रोश मोर्चा काढला. महिलांसह तरुणी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,या मोर्चात महिलांचा संताप ओसंडून वाहत होता. ‘दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे’, नवनिर्माण सेना, बहुजन विकास आघाडी, ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन आणि इतर सामाजिक संघटनांनी देखील या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला.
डहाणू तालुक्यातील नरपड गावातील नागरिकांनी आपल्या घरापासून मोर्च्याला सुरुवात केली. इराण रोड, डहाणू येथून निघालेला हा मोर्चा तारपा चौकात पोहोचताच जाहीर सभेत रूपांतरित झाला. या सभेत आदिवासी एकता परिषदेचे राज्य सचिव आणि आदिवासी समन्वय मंच भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील पऱ्हाड, केंद्रीय अध्यक्ष मंडळ सदस्य राजू पांढरा, कीर्ती वरठा, जिल्हा सचिव प्रदीप ढाक, पालघर तालुका महिला संघटक मोहिनी खरपडे, ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष माधव लीलका, मनसे तालुका अध्यक्ष विपुल पटेल, यशोधन पाटील, ऍड.देऊ नारळे, नरपड सरपंच चेतना उराडे, वाकी सरपंच दिनकर दयात, प्रितम कलंगाडा, युट्युबर तथा पत्रकार अरविंद बेंडगा, सुभाष कलंगाडा, कापशी सरपंच प्रकाश कोम, गजानन पागी, काशीराम वरठा, समीर वरठा, हरेश्वर दिवे, पूनम कोल, दशरथ बामनिया, सुभाष तांडेल, राष्ट्रीय दलित पँथरचे विनायक जाधव, उमेश ढाक, प्रितम ताई आणि अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते,सभेत मान्यवरांनी महिलांवरील आणि लहान मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि जलदगती न्यायप्रक्रियेची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आरोपीस कठोर शिक्षा मिळावी, पीडित कुटुंबास त्वरित मदत द्यावी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली,मोर्च्याच्या अखेरीस पोलिस प्रशासनाने आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनातून डहाणूतील नागरिकांनी एकजूट दाखवत अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेतल्याचा संदेश दिला. आदिवासी एकता परिषद आणि इतर संघटनांनी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालघर जिल्हा सहसचिव पौर्णिमा परेड यांनी केले. मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत मोर्च्याचा समारोप करण्यात आला.

