दिपक केसराळीकर
तालुका प्रतिनिधी बिलोली
बिलोली तालुक्यातील गंजगाव येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक येथील शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटन विठ्ठल चंदनकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आजी माजी सरपंच यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.तर प्रमुख पाहुणे विठ्ठल चंदनकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साईराम बावलगावे, उपध्यक्ष करिम शेख, पत्रकार वैभव घाटे आदींची यावेळी प्रमुख उपस्थित होती.
या सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गिते, लावणी, मराठी, तेंलगु,हिंदी, चित्रपटातील गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.साक्षरता गित घेवुन विद्यार्थी व पालकाच्या जिवन चरित्रा वर प्रकाश टाकणा-या गिताचा मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला होता.
या कार्यक्रमात शाळेतील व अंगणवाडीतील बाल कलाकार विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सहभाग नोंदविला होता.यावेळी गावातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
सदरील कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक अनिल रायकंटवार,मेञे,भांगे, स्वप्निल सर शितल कंधारे मॕडम यांनी परिश्रम घेतले.सदरील कार्यक्रमाला सरपंच सौ. सुनिता कनशेटे,उपसरपंच रेखा बावलगावे, सरपंच प्रतिनिधी हाणमंतराव कनशेटे, माजी सरपंच माधवराव घाटे,दत्तात्रय गायकवाड,अनिता गंजगावकर, माणिकराव बासरे, आरिफपाशा पठान, सेवक सैलानी शेख,शादुल शेख यांच्या सह गावातील प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुञसंचलन सहशिक्षक जामनोर यांनी केले तर आभार मेञे मानले.