हूनगुंदा मांजरा नदी पात्रात सुरु होते अवैद्य वाळू उत्खनन
बिलोली महसूल प्रशासनाचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष
सिध्दार्थ कांबळे
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हुनगुंदा येथील मांजरा नदी पात्रातुन रात्री-बेरात्री अवैद्यरित्या रेती उपसा होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर कुंडलवाडी पोलिसांनी मांजरा नदीपात्रात शोध मोहीम राबवून एका ट्रॅक्टरला पकडून कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीमुळे अवैद्य धंदे करणाऱ्या वाळू माफियाचे धाबे दणाणले असल्याचे पहावयास मिळत आहे…
कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या हूनगुंदा,नागणी,माचनूर,गंजगाव आदी गावामध्ये लाल वाळूचे घाट असून या वाळू घाटातून चोरीने वाळू उपसा करण्यासाठी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला हाताशी धरून वाळू माफियाकडून मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू उपसा केली जाते.? याच अनुषंगाने २३ जानेवारी रोजी गंजगाव रेती घाटातून हायवाने वाळू वाहतूक करण्यासाठी १७ हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत तुकाराम नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक नारायण मारोतीराव शिंदे हे दोन पोलीस अधिकारी अडकल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यावर अवैद्य धंदे व अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफीयावर कडक कार्यवाही करण्याचा इशारा दिला होता, त्याच अनुषंगाने दिनांक १ जानेवारी रोजी सायंकाळी ०८:०० वाजताच्या सुमारास हूनगुंदा येथील मांजरा नदी पात्रात अवैद्यरित्या वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नदी पात्रात सर्च ऑपरेशन करून ट्रॅक्टर क्रमांक टि.एस. १६ ई.एन. ५२१२ पकडून फिर्यादी रघुवीर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गु.र.न. ११/२२ कलम ३०३(२) ३ (५) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गाडी चालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. या कार्यवाहीमुळे अवैद्य वाळू माफियाचे धाबे दणाणले असल्याचे पहावयास मिळत आहे.
ही कार्यवाही पोलीस प्रशासनाने केल्यामुळे बिलोली तहसील चे महसूल प्रशासन मात्र कुंभाकर्णच्या झोपेत आहे का? अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदरील सर्च ऑपरेशन कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे,पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर चव्हाण, माधव पाटील,अमरनाथ शिंदे,ईद्रीस बेग आदी कर्मचाऱ्यांनी केले आहे. पुढील तपास माधव पाटील हे करीत आहेत….
ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक वर कार्यवाही गंजगाव वाळू घाटातून कुंडलवाडी मार्ग पुसद कडे वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकला कुंडलवाडी पोलिसांनी पावतीची मागणी केली असता त्यांच्याकडे ३ ब्रास वाळूची पावती आढळून आली,ट्रक क्रमांक एम.एच.४० सी.टि ०३६२, एम.एच.१८ ऐ.ऐ. ९६६८ या गाड्यांची प्रत्यक्ष तपासणी केली असता त्यात क्षमतेपेक्षा जास्त सात ब्रास वाळू आढळून आल्याने फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पांडुरंग शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेश मोहन आडे वय ३४ राहणार कवडीपूर तालुका पुसद, शेख सोहेल शेख जलील राहणार वसंत नगर पुसद यांच्याविरुद्ध गु.र.न. १०/२५ कलम ३०३ (२)३(५) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास माधव पाटील हे करीत आहेत.
चौकट मध्ये घ्या