सुधीर जाधव
जिल्हा प्रतिनिधी, सातारा.
सातारा : भांबवली येथे गावात बिबटया घुसुन घरा समोर मांजर मारले, जोरात आरडा-ओरडा केल्यावर तो केळीतुन पळाला. तेथील चिखलात बिबटयाच्या पायाचे ठसे उमटले त्यावरून तो मोठा बिबटया आहे, याचा अंदाज येतो आहे. त्यामुळे गावातील लोकांना मध्ये भय निर्माण झाले आहे. हिंस्त्र प्राण्यांपासुन स्व- संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने स्थानिकांना बंदुका दिल्या पाहिजेत. हिंस्त्र प्राण्यांनी माणसे मारली तरी चालतील पण माणसांनी हिंस्त्र प्राणी मारू नये हा उपराटा कायदा बदलणे आवश्यक आहे. आपल्या परिसरात शासनाने बिबटा, अस्वल, अजगर, नाग सोडलेले आहेत. कोयना अभयारण्यातील प्राण्यांसाठी डीपीडीसी, सातारा, यांनी रू. २० करोड निधी दिला. विकासाचा पुर्ण निधी प्राण्यासाठी वापरला गेला, निवडणुक व इतर कारणे देवुन विकासाचा निधी अभयारण्यातील प्राण्यांकडे फिरविला गेला. विकास नको, प्राणी हवेत, हा कुठला न्याय? असा स्थानिकांना प्रश्न निर्माण झाला आहे.