महागांव तालुक्यातील काळी (दौ.) वनविभागाची धडक कार्यवाही
रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान
महागांव ः दिनांक २ फेब्रुवारी रात्री ३:० ० वाजेच्या दरम्यान बिट गुंज वर्तुळ काळी दौ.वनपरिक्षेत्र अंतर्गत राखीव वन खंड क्र.८१८ मध्ये अवैध रीत्या प्रवेश करुन शासकीय मालमत्तेच्या जमिनीवर अवैधरित्या खोदकाम करुन तसेच माती मिश्रीत मुरूम दगड इत्यादीची अवैध पध्दतीने वाहतूक करतांना रात्रीचे वेळी एक ट्रॅक्टर क्रमांक व नंबर नसलेला स्वराज ७४४ तसेच ट्रॅली माती मिश्रीत मुरूम भरून ०२. घ.मी.वाहतुक करीत असतांना काळी दौ.वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी राखीव वनामध्ये जप्त केले बाबत वन अपराध क्र.७४१/०१/२०२५ दिनांक ०२/०२/२०२५ नुसार भारतीय वन अधिनियम १९ . २७. चे विविध कलमान्वये वन अधिनियमानुसार गुन्हा जारी करण्यात आला आहे आरोपी नामें.आकाश पांडुरंग कालेवाड वय वर्षे २२ रा.अंबोडा ता.महागाव यास मोक्यावर मुद्देमालासह ताब्यात घेन्यात आले आहे मात्र इतर सोबत असलेले आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मोक्यावरून पसार झाले आहेत त्यांचा शोध वनविभागाकडून जारी आहे मोक्यावर जप्त केलेला ट्रॅक्टर मालमत्ता एक नग अंदाजे साडे तीन लक्ष ट्रॅली ७००००/ एक दुचाकी ५०,००० एक मोबाईल फोन व इतर साहित्य व माती मिश्रीत मुरूम ०२. घ.मी.असे अंदाजे एकुण ४,लाख ८८ हजार रुपयांचा मालमत्ता जप्त करण्यात आला आहे सदर कार्यवाही डॉ.बि.एन स्वामी, उपवनसंरक्षक पुसद वन विभाग पुसद तसेच शशांकदम सहायक वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) पुसद यांचे मार्गदर्शनाखाली सम्राट मेश्राम वनपरिक्षेत्र अधिकारी,(काळी दौ.)एस.बि.बदुकले (वनपाल) डी.जी.सावते वनरक्षक गुंज, अविनाश डी.राठोड (वनरक्षक) डी.एस.कोळी (वनरक्षक) तथा श्रीकांत डोरले व सर्व वनरक्षक यांनी यशस्वीपणे कार्यवाही केली आहे