तुकाराम पांचाळ
ग्रामीण प्रतिनिधी धर्माबाद
धर्माबाद: दि २ फेब्रुवारी धर्माबाद येथील राजाराम काकानी नामांकित CBSE शाळेत वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर शाळेचे संचालक सुनिल श्रीवास्तव प्राचार्य सौरव सक्सेना यांच्या सह सहकारी शिक्षक वृंद समवेत दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करुन 105 चिमुकल्यांनी अगदी सुंदर मंत्र स्तोत्र घेत आई वडील सोबत सामूहीक श्री विद्यारंभ सरस्वती पूजन करण्यात आले.शाळेचे व्यवस्थापकीय संचालक सुबोध काकाणी यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम गतवर्षी पासुन यशस्वीपणे शाळेच्या वतीने राबवत आहोत.पुरोहित म्हणुन शाळेतील तेजस गुरूजी, गणेश गुरूजी येताळकर व साईनाथ देशमुख गुरूजी यांनी सुरेख पूजन विद्यार्थ्यासाठी पालकांकडून करून घेतले.पूजनासाठी शाळेच्या वतीने सरस्वती पूजन साहित्य व पाटीसह शालेय साहित्य किट मोफत देण्यांत आली होती. अशा प्रकारच्या अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण विषयी सकारात्मकता निर्माण होते. व त्यामुळे त्यांचा शैक्षणीक प्रवास सुखकर व गौरव प्राप्त करणारा ठरतो. असे मत श्री शाळेचे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री सुबोध जी काकाणी यांनी या शुभ प्रसंगी आपले मत व्यक्त केले.लहान लहान मुलांनी खेळ साहित्याचा मन मुराद आनंद लुटला.सदरील सामजिक व अध्यात्मिक उपक्रम शाळेच्या उपक्रमशील PRO स्वाती पोटगांटीवार यांच्या नियोजनातून संपन्न झाला.नावीन्यपूर्ण उपक्रमाचे धर्माबाद शहरात व परिसरात सर्वत्र पालक वर्गातून कौतुक होत आहे.