पवन ठाकरे
ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर: जळगाव जामोद तालुक्यातील सखारामपूर(ईलारा)श्री संत सखाराम महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप दिनांक 3 फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी ह भ प भास्करगिरी महाराज बोलत होते.यावेळी श्री संत गुरुवर्य तुकाराम महाराज याची प्रमुख उपस्थिती होती.सकाळी दहा वाजता काल्याच्या कीर्तनाला आरंभ झाला होता. हजारो भक्तांनी नियोजनबद्ध पणे कीर्तनाचा लाभ घेतला होता.यावेळी जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ संजय कुटे. साहेब काॅग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ स्वातीताई वाकेकर. बाजार समिती सभापती प्रसेनजीत पाटील. जयश्री ताई शेळके. शिवसेना संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर. प्रकाश पाटील. सचिन बापू देशमुख. दत्ता पाटील. ज्ञानेश्वर दादा पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संत तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज मोरे देहूकर यांचे सह बऱ्याच संत मंडळी यांनी सुध्दा या यात्रा महोत्सवाला उपस्थिती दर्शविली होती. हजारो भाविकांसह 250 दिंड्यांनी महोत्सवात सहभाग घेतला होता. यावेळी हजारो भक्तांनी श्री संत सखाराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते.
(संत सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह भ प गुरुवर्य तुकाराम महाराज यांचे नियोजन व मार्गदर्शनातून हा यात्रा महोत्सव संपन्न झाला आहे.)