दिपक केसराळीकर
तालुका प्रतिनिधी बिलोली
१० वी १२ वीनंतर विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांचा पाया पक्का, भक्कम व्हावा यासाठी ‘आकाश’ इन्स्टिट्यूच्या वतीने (दि.२५) एमएचटी-सीईटी अभ्यासक्रमाची घोषणा केली असून, बोर्डाच्या परीक्षेनंतर त्याची सुरुवात होणार आहे. यावेळी व्यवसाय प्रमुख डाॅ. एच. आर. राव, राज्य प्रमुख अभिषेक कुमार सिन्हा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.’आकाश’मध्ये एमएचटी-सीईटी अभ्यासक्रमाची लाॅचिंग
नांदेडमध्ये कार्यक्रम – २०२४ मध्ये ‘नीट’ व ‘जेईई’ अडव्हॉन्समधील गुणवंतांचा सत्कार
नांदेड, पुढारी वृत्तसेवा – ‘आकाश’मध्ये राष्ट्राचे भविष्य घडविण्याचा निर्धार केलेल्या तरुण बुद्धिमतांना ज्ञानदान करण्याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्रातील एमएचटी-सीईटी कोर्सेसच्या लाॅंचमुळे विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेच्या शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी सर्वांगीण प्रशिक्षण देण्याचा उपक्रम आम्ही सुरु केला आहे. हा उपक्रम मजबूत शैक्षणिक पायासाठी आखलेला असून, ज्यामध्ये तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण आणि वैयक्तिक मार्गदर्शन असणार आहे, असे ‘आकाश’चे राज्य प्रमुख अभिषेक कुमार सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.आकाश इन्स्टिट्यूटतर्फे (दि.२५) नांदेड येथे नीटमधील २५ तर जेईई अडव्हान्समधील विद्यार्थ्यांचा गौरव आणि एमएचटी-सीईटी कोर्स लांचप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आकाशचे मुख्य शैक्षणिक आणि व्यवसाय प्रमुख डॉ.एच.आर. राव यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.’आकाश’ एज्युकेशन सोसायटी हे राष्ट्रीय परीक्षेच्या तयारी क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. आज नांदेडसह महाराष्ट्रात चॅम्पियन्स ऑफ ‘आकाश’ हा सोहळा आयोजित केला असून, त्यात ‘नीट’ व ‘जेईई’ अडव्हान्समध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान अभिषेक कुमार सिन्हा यांनी आज नांदेड येथे १० वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी कोर्सेसची घोषणा केली असून, हे वर्ग बोर्डाच्या परीक्षेनंतर सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.हे आहेत सर्वोच्च गुणवत्ता धारक विद्यार्थी’नीट’मध्ये प्रज्वल पालास्कर, अपर्णा रामेश्वर रेड्डी, ऋषिकेश माधवराव जाधव, पवनकुमार माणिक गाडेकर, आस्था मनीष कान्हेड, प्रतीक्षा सर्जेराव पोले, रेयान सिद्दीकी, माही मस्त सागर, तटराव विनायक ठाकूर, ऋषिकेश गणेश कराळे, शैलेश संतोष पाटील, मनमाथ राजू शेटे, नितीशकुमार डोंगरे, स्वप्निल वैद्य, ऋषिकेश पोले, सानिका जिरवणकर तर ‘जेईई’ अडव्हान्समध्ये अक्षय कदम आणि अथर्व रायपटवार यांनी नेत्रदिपक यश मिळविलेले असून, त्यांना ‘आकाश’ इन्स्टिट्यूटतर्फे पालकांसोबत विशेष गौरव करून बक्षिसे देण्यात आली.राष्ट्राचे भविष्य घडविण्याचा निर्धार’आकाश’ इन्स्टिट्यूटने राष्ट्राचे भविष्य घडविण्याचा निर्धार केलेला असून, त्यादृष्टीने अभ्यासक्रमाची आखणीही केलेली आहे. त्यात भर पडली ती, एमएचटी-सीईटी अभ्यासक्रमाची,आमचे हे पाऊल विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षेमध्ये टिकून राहण्याचा फलदायी ठरणार आहे, असा विश्वासही अभिषेक कुमार सिन्हा यांनी दिला आहे.’नीट’मध्ये प्रवेशाचा रेकाॅर्डब्रेक
शैक्षणिक स्पर्धा परीक्षांमध्ये ‘आकाश’ इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी टिकून राहावा यासाठी, त्याच्याकडे विशेष लक्ष पुरविले जाते. त्याचा फायदा म्हणजे ‘नीट’ आणि ‘ऑलिम्पियाड’ सारख्या उच्च दर्जाच्या परीक्षांमध्ये ‘आकाश’चे विद्याऱ्यांनी रेकाॅर्डब्रेक निकालाची परंपरा जपून ठेवलेली आहे.राष्ट्रीय स्पर्धात्मक परीक्षांमध्ये ‘आकाश’ इन्स्टिट्यूचा विद्यार्थी टिकून राहावा, यासाठी ‘आकाश’ने स्वतंत्र अभ्यासक्रमाची उपलब्धता केलेली असून, प्राध्यापकांचीही उपलब्धता आहे. त्यामुळेच ‘नीट’, ‘जेईई’ सारख्या परीक्षांमध्ये ‘आकाश’च्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळविले आहे. यापुढे, असेच उच्चदर्जाचे शिक्षण देण्याचा मानस ‘आकाश’ने केलेला आहे. एच. आर. राव, मुख्य शैक्षणिक व्यवसाय प्रमुख (आकाश इन्स्टिय्यूट) यांनी म्हटले आहे.